Government Jobs: खूशखबर! राज्यात ७० हजार पदांची होणार नोकर भरती; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Job Alert : महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली आहे. ७०,००० हून अधिक सरकारी पदांची भरती टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.
Government Job
Chief Minister Devendra Fadnavis announcing a major government recruitment drive for unemployed youth in Maharashtra.Saam Tv
Published On
Summary
  • राज्यात ७० हजारांहून अधिक पदांची नोकर भरती

  • एमपीएससीमार्फत सुमारे २० हजार पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा

  • भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने आणि नव्या पद्धतीने होणार आहे.

बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. साधरण ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे, भरली जाणार आहेत.

Government Job
अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार? सरकार उद्योग अन् रोजगारावर भर देणार?

तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचादेखील यात समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेतला जाईल असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली असून यात सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात चर्चा झाली.

Government Job
Election News: दोन मुलांपेक्षा अधिक अपत्य असले तरी निवडणूक लढवता येणार, सरकारचा मोठा निर्णय

या बैठकीला मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते. प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवता याव्यात. मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेला प्राधान्य असावं. शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकर घेतला जाणार असल्याची ही मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

सामान्य प्रशासन विभाग केवळ औपचारिक नाही, तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात ७० हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडेल. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वांना आवडले. पंतप्रधान मोदींनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिलेत. महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचेही मोदींनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com