Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

Sushil Kedia on Raj Thackeray : मुंबईत राहूनही उद्योजक सुशिल केडियांनी मराठीविरुद्ध गरळ ओकलीय.... राज ठाकरेंवर टीका करताना मराठीविषयी द्वेष व्यक्त करणारं वक्तव्य केलंय... नेमकं सुशील केडियाने काय वक्तव्य केलंय? पाहूयात.....
Sushil Kedia on Raj Thackeray
Sushil Kedia on Raj Thackeray Saam Tv news
Published On

स्नेहील झनके, साम टिव्ही

मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत राहणाऱ्या , मुंबईवर जगणाऱ्या आणि मराठी माणसाच्या जीवावर तरणाऱ्या या केडीयाचा हा माज तर बघा... हा केडीया गेली 30 मुंबईत राहतोय. मराठी माणसाच्या श्रमावर मोठा झाला तो आज आपल्या आपल्या मराठीलाच लाथाडतोय. होय होय होय.. तुम्ही जे ऐकताय ते अगदी खरंय.. तुम्हाला आता आम्ही जे ट्विटर प्रोफाईल दाखवणार आहोत ते पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल

राज ठाकरे के बाप का महाराष्ट्र हैं क्या ?

या रिट्विटनंतर केडीयात 10 हत्तीचं बळ संचारलं आणि त्यानं 3 जुलैला संध्याकाळी 6:52 मिनिटांनी काय लिहीलंय. तेही पाहा,

राज ठाकरे लक्षात ठेव,

मी गेली ३० वर्षं मुंबईत राहतोय. मला अजूनही नीट मराठी येत नाही.

आणि तुमच्यासारख्या लोकांच्या गैरवर्तनामुळे मी आता ठाम निर्धार केलाय.

जोपर्यंत तुमच्यासारखे लोक "मराठी माणसाची" काळजी घेत असल्याचा बनाव करत राहतील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, अशी मी प्रतिज्ञा करतो.

काय करायचं आहे, बोल?

Sushil Kedia on Raj Thackeray
ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

अशा मस्तवाल भाषेत ट्विट करुन हा केडीया थांबलेला नाही तर त्यानं यानंतर राज ठाकरेंना अधिकच डिवचलंय. ३ जुलैलाच ९ वाजून ३८ मिनिटांनी त्यानं पुढचं ट्विट केलं त्यात काय म्हणतोय पाहा,

नाटकं बंद कर, राज ठाकरे

तुझे दोन-चार गुंड येऊन १०–२० थपडा मारतील, तर मारू देत.

पण आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला आणि आमरण उपोषण जाहीर केलं,

आणि ठरवलं की जोपर्यंत तू हात जोडून माफी मागत नाहीस, तो पर्यंत काहीही खाणार नाही. तर मग तुझं काय उरेल सांग?

देवेंद्र फडणवीसजी,

राज ठाकरेंकडून गैरमराठी लोकांना दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि हिंसाचारावर तुम्ही शांत राहणार का?

Sushil Kedia on Raj Thackeray
Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

फडणवीसांना प्रश्न विचारून केडीयानं मंत्री नितेश राणेंची माध्यमांना दिलेली प्रतिक्रीया रिट्विट केली ज्यामध्ये त्यांनी गरिब हिंदूंवर हात उचलणाऱ्यांनी एकदा नळ बाजार आणि मोहम्मद अली रोडवर जाऊन जिहादींना मारण्याची हिम्मत दाखवावी असं म्हटलं होतं. शुक्रवारी रात्री गरळ ओकूनही केडीयानं शनिवारी दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी पुन्हा मुंबई पोलिसांना आणि अमित शाहांना टॅग करत मला सुरक्षा द्या अशी मागणी केली.

एकीकडे मराठीच्या सन्मानासाठी दोन राजकीय विरोधी पक्ष शनिवारी एकत्र येतायेत. महाराष्ट्रात शनिवारी मराठीचा विजयोत्सव होतोय. तर दुसरीकडे याच मराठी द्वेष्ट्यांनी मराठी विरोधात कुठे मोर्चे काढलेत तर कुठे ट्विट करुन या सोहळ्याला दृष्ट लागेल अशी गरळ ओकत आपल्या अभिजात मराठीचा लचका तोडलाय. मुंबईसह महाराष्ट्र यंदा षट्षष्ट्यब्दीपूर्ती सोहळा साजरा करतोय आणि गेल्या ६५ वर्षापासून या केडीयासारख्या कृतघ्न लोकांमुळेच आपल्याच घरात हाल सोसतेय मराठी असं दिसतंय. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी जशी मराठी माणसांची वज्रमुठ एकवटली होती तीच ताकद आता या मराठी द्वेष्ट्यांच्या विरोधात दाखवायची वेळ आली आहे.

Sushil Kedia on Raj Thackeray
उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com