उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात'चा VIDEO कुठला अन् कधीचा? महाराष्ट्र की गुजरात? वाचा सविस्तर...

Uddhav Thackeray : विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचा देखील जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हणत असलेला व्हिडिओ शेअर केला.
uddhav thackeray old speech clip of jay hind jay maharashtra jay gujarat
uddhav thackeray old speech clip of jay hind jay maharashtra jay gujaratSaam Tv News
Published On

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात 'जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात' म्हटल्यानं नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली. या वादानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांचा देखील 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात', असं म्हटल्याचा व्हिडिओ शेअर केला. जय गुजरातच्या मुद्यावरुन महाराष्ट्रात नव्या राजकारणाला तोंड फुटलं आहे.

विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरे यांचा देखील जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात असं म्हणत असलेला व्हिडिओ शेअर केला.

uddhav thackeray old speech clip of jay hind jay maharashtra jay gujarat
Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शेअर करण्यात आलेला उद्धव ठाकरे यांचा व्हिडिओ सहा वर्षांपूर्वीचा आहे. भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा २०१९च्या लोकसभा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी रालोआच्या नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. रामविलास पासवान, प्रकाशसिंह बादल यांच्यासह उद्धव ठाकरे देखील त्यावेळी उपस्थित राहिले होते. अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी जी सभा झाली होती त्या सभेत म्हणजेच गांधीनगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाषण संपवताना 'जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय गुजरात' असं म्हटलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना एनडीएमध्ये होती. अमित शाह यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ३० मार्च २०१९ रोजी भरला होता. अमित शाह यांच्या फेसबुक पेजवरील ३० मार्चच्या लाईव्ह स्ट्रीममध्ये उद्धव ठाकरेंचा 'जय हिंद,जय महाराष्ट्र आणि जय गुजरात' असं म्हटलेलं भाषण आहे.

uddhav thackeray old speech clip of jay hind jay maharashtra jay gujarat
Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com