Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Raj and uddhav thackeray : मराठीसाठी ठाकरे बंधूंनी वज्रमूठ आवळलीय.. मात्र त्यामुळे महायुतीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे... तर मराठी एकजूटीने ठाकरेंची ताकद कशी वाढणार आहे? पाहूयात....
Raj-Uddhav Thackeray Alliance
Raj-Uddhav Thackeray Alliance Saam Tv News
Published On

हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर ठाकरेंनी एकत्र विजयी मेळावा घेत एकीची वज्रमूठ आवळलीय....याच मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र येण्यामुळे युतीच्या चर्चांनी जोर धरलाय...त्यामुळेच महायुतीला धडकी भरल्याची टीका राऊतांनी केलाय.

Raj-Uddhav Thackeray Alliance
Sanjay Raut : हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर संजय राऊतांची तिखट प्रतिकिया

खरंतर 2005 मध्ये राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले... त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी या चिमण्यांनो परत फिरा रे म्हणत राज ठाकरेंना परत येण्याचं आवाहन केलं होतं.. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत दोन्ही भावांचं मनोमिलन झालं नाही... मात्र आता हिंदीसक्तीच्या मुद्द्यावर दोन्ही बंधूंनी एकीचा नारा दिलाय...याच ठाकरे बंधूंच्या एकीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय..

Raj-Uddhav Thackeray Alliance
Birth Rate : मुलं जन्माला घालणाऱ्या पालकांना मिळणार 120,000 रुपये; कोणत्या देशाने केली घोषणा?

विधानसभेत मुंबईत मनसेला 7 तर ठाकरे सेनाला 23 टक्के मतं

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पडझडीमुळे सक्षम विरोधक म्हणून पुढे येण्यास वाव

ठाकरेंच्या युतीमुळे मुंबई महापालिका निवडणुकीत चुरस निर्माण होणार

मराठीच्या मुद्द्यावर एकी झाल्यास शिंदे गटाची ताकद कमी होण्याची शक्यता

Raj-Uddhav Thackeray Alliance
Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं ही बाळासाहेब ठाकरेंची इच्छा त्यांच्या हयातीत पूर्ण झाली नाही... मात्र आता बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर का होईना दोन्ही बंधू एकत्र आल्यास त्याचा मोठा फायदा ठाकरे बंधूंना होण्याची शक्यता आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com