Eknath Shinde News : मिरा रोडमधील मराठी भाषिकांच्या आंदोलनानंतर शिंदेंची शिवसेना टेन्शनमध्ये आली आहे. त्याची कारणं काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..
मराठी भाषिकांचा हा उद्रेक आहे शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईकांच्या विरोधातील...कारण सरकारने मराठी अस्मितेला नख लावणाऱ्या मुजोर परप्रांतियांच्या मोर्चाला परवानगी दिली.. मात्र मराठी भाषिकांच्या मोर्चाला परवानगी नाकारली... त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईकांना स्वतःच्याच मतदारसंघात मराठी भाषिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं... त्यामुळे शिंदे गटाचं टेन्शन वाढलंय...
खरंतर मिरा भाईंदर मतदारसंघात प्रताप सरनाईकांनी विकास कामांचा धडाका लावलाय... मात्र हिंदीसक्तीच्या निर्णयाविरोधात स्पष्ट भूमिका न घेणं, एकनाथ शिंदेंनी दिलेला जय गुजरातचा नारा यामुळे आधीच शिंदेगट अडचणीत आलाय. त्यातच परप्रांतीयाचा मोर्चा आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून निघालेला मराठी मोर्चा यामुळे आपल्याच मतदारसंघात कोंडी होण्याची शक्यतेने सरनाईकांची पळापळ झाली....
मिरा भाईंदरमधील मराठी भाषिकांनी सरनाईकांना हुसकावून लावल्यानंतर शिंदे गटाचे इतर आमदार टेन्शनमध्ये आलेत.. जी परिस्थिती सरनाईकांवर आलीय ती आपल्यावरही येऊ शकते अशी भीती शिंदे गटातील आमदारांना वाटू लागलीय...त्याची कारणं काय आहेत? पाहूयात...
मुंबईत 40 टक्के तर मिरा भाईंदरमध्ये 27 टक्के मराठी भाषिकांची संख्या
मुंबईतील 227 पैकी 112 मतदारसंघात मराठी भाषिकांचा प्रभाव
मराठीविषयी ठोस भूमिका न घेतल्याने निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता
ठाकरे बंधू एकत्र आल्यास शिंदे गटाच्या मतांमध्ये घसरण होण्याची शक्यता
दोन्ही ठाकरे बंधूंची एकजूट आणि मराठी भाषिकांचा संताप असाच राहिला तर मुंबईत शिंदे गटाची अवस्था बिकट होण्याची शक्यताच जास्त आहे... त्यामुळे आता मराठी भाषेसंदर्भात शिंदे गट काय भूमिका घेणार? यावर महापालिकांच्या विजयाचं गणित ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.