Mumbai to Nanded Vande Bharat Start Date : गेल्या काही दिवसांपासून नांदेड-परभणीकरांना पडलेल्या प्रश्नांचे उत्तर अखेर मिळाले आहे. मुंबई सीएसएमटी-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन धावण्याचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २६ ऑगस्ट २०२५ पासून नांदेड-संभाजीनगर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस धावणार आहे. भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. मुंबई-नांदेड मार्गावर धावणारी ही वंदे भारत सेमी-हायस्पीड ट्रेनमुळे नांदेडकर आणि परभणीकरांचा प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होईल. मुंबई-नांदेड वंदे भारत कोण कोणत्या स्थानकावर थांबणार? तिकिट किती असणार? कोणत्या वेळेला कोणत्या स्थानकातून सुटणार? (Mumbai-Nanded Vande Bharat Express scheduled) याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात... (Nanded-Mumbai Vande Bharat: Timings, Stops, and Ticket Fare Details)
परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण, ठाणे आणि दादार या स्थानकावर नांदेड-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस थांबणार आहे. परभणी आणि नांदेड या दोन शहरातील नागरिकांना मुंबईला प्रवास करणं आता आणखी सोप्पं होणार आहे.
मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेसच्या तिकीट दराबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. पण माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, एसी चेअर कारचे तिकीट १,७५० रुपये आणि एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कारचे तिकीट ३,३०० रुपये असू शकते.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन नांदेडहून सकाळी ५:०० वाजता सुटेल आणि दुपारी २:२५ वाजता मुंबई सीएसएमटी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात मुंबई सीएसएमटीहून दुपारी १:१० वाजता सुटून रात्री १०:५० वाजता नांदेडला पोहोचेल.
वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाल्यामुळे नांदेडकरांचा प्रवास आरामदायी होणार आहे, पण वेळही वाचणार आहे. मुंबई-नांदेड या प्रवासाचा कालावधी सुमारे ९ तास २५ मिनिटे असेल. सध्याच्या इतर ट्रेनच्या तुलनेत २ तास कमी आहे.
नांदेड-वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन २० डब्यांची असेल. १६ एसी चेअर कार आणि ४ एक्झिक्युटिव्ह चेअर कार डब्बे असतील. संभाजीनगरपर्यंत धावत होती, त्यावेळी या एक्सप्रेसला ८ कोच होते. पण त्यानंतर नांदेडपर्यंत विस्तार केल्यानंतर आणखी ८ डब्बे वाढवण्यात आले आहेत.
नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाल्यामुळे मराठवाडा आणि मायानगरी आणखी जवळ आली आहे. आरामदायी आणि जलद प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. या एक्सप्रेसमधील कोच वातानुकूलन, सीसीटीव्ही, वायरलेस चार्जिंग आणि स्वच्छतेच्या आधुनिक सुविधा असतील. या ट्रेनमुळे मराठवाड्यातील प्रवाशांना, विशेषतः नांदेड आणि परभणीतील नागरिकांना, मुंबईशी जलद कनेक्टिव्हिटी मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.