अकोला हादरलं! इन्शुरन्स 'मॅनेजर'वर अत्याचाराचा प्रयत्न, बचावासाठी केला गुप्तांगावर वार

Akola Crime: अकोल्यात विमा कंपनीतील महिला मॅनेजरवर अत्याचाराचा प्रयत्न. तरुणीने प्रसंगावधान राखत आरोपीच्या गुप्तांगावर वार करून स्वतःचा बचाव केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.
Akola insurance agent tries to molest female manager in parked car
Scene of the shocking incident in Akola where an insurance agent allegedly tried to assault a woman manager inside his carSaam TV News Marathi
Published On

अक्षय गवळी, अकोला प्रतिनिधी

Akola insurance agent tries to molest female manager in parked car : अकोला शहरातत घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. जठारपेठ चौकात अर्थातच अगदी गजबजलेल्या रस्त्यावर कारमध्ये एका तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न झालाय. त्यावेळी स्वतःचा बचाव करत या तरुणीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर (गुप्तांग) वार करीत सुटका केलीय. 'आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी'तील या 22 वर्षीय 'युनिट मॅनेजर तरुणी'सोबत कंपनीतीलच एजंट'ने हा प्रकार केला आहेय. गणेश ठाकूर असं अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्या कंपनीतील 'एजंट'चे नाव आहे. दरम्यान, घटनेनंतर एजंट हा मॅनेजर तरुणीला मोबाईल मेसेजद्वारे बदनामीबाबत तसेच सुसाईड करून गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊ लागला. अशा तक्रारीनंतर गणेश ठाकूर यांच्याविरुद्ध अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलिसांत गुन्हा दाखल झालाय. 75(2), 76, 351(2)(3) बी.एन.एस या विविध कलमानूसार गुन्हे दाखल झाले.

नेमकं प्रकरण काय होतंय ? 

दिलेल्या तक्रारीनुसार, अकोल्यातल्या गौरक्षण रस्त्यावर आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स कंपनी आहे, येथे 'युनिट मॅनेजर' या पदावर पीडित तरुणी कार्यरत आहे. तिच्याकडे कंपनीने नमूद केलेला गणेश ठाकूर हा एजंट व्यवसाय करून घेण्यासाठी दिलेला होता. ती 16 जूनला ऑफिसमध्ये ड्युटीवर असताना एजंट गणेशने म्हटले की कस्टमर कॉल आहे, तिथं जावं लागणार.

Akola insurance agent tries to molest female manager in parked car
मोठी बातमी! संजय गायकवाडांची कर्मचार्‍याला बेदम मारहाण, शिंदेंच्या शिलेदाराचा प्रताप कॅमेऱ्यात कैद

पुढं दोघेही तिथे जाण्यासाठी कार्यालयातून बाहेर पडले. त्याने त्याच्या कारमध्ये येण्यासाठी तिला आग्रह केला. कारच्या पाठीमागील सीटवर ती बसली. कस्टमरचं घर दाखवण्याच्या उद्देशाने त्याने अकोला शहरातल्या अनेक रस्त्यांवर फिरवलं. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास जठारपेठ चौकातल्या एका नामांकित दूध डेरी समोर गाडी उभी केली. अगदी वर्दळीचा हा रस्ता आहे. येथे तो पाठीमागील सीटवर येऊन बसला. मॅनेजर तरुणीसोबत बोलत असतानाच त्याने अचानकपणे हात पकडत तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान तरुणीने आरडाओरड करायला सुरुवात करताच त्याने तोंड दाबले आणि तिला मारहाण केली. असं तक्रारीत नमूद आहे. पुढ..

Akola insurance agent tries to molest female manager in parked car
खुशखबर! पुण्याला १२ नव्या मेट्रो मिळणार, जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावणार

स्वतःचा बचावासाठी तिने केला गुप्तांगावर वार...

एजंट गणेश इथेच न थांबता तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवण्याचा प्रयत्न करीत होता, तसेच तिच्याकडे शरीर सुखाची मागणी करू लागला. तरुणीने त्याला जोरदार धक्का देत, त्याच्या प्रायव्हेट पार्ट म्हणजेच गुप्तांगावर लाथ मारली. आणि बाजूला पडलेल्या चाबीने गाडी अनलॉक केली, आणि कारमधून पळ काढला. त्यानंतर आरोपीने सतत फिर्यादीला बोलून व मोबाईल मेसेज करून बदनामी करण्याबाबत तसेच स्वतः सुसाईड करून फसविण्याबाबतची धमकी देऊ लागला. अखेर तरुणीने सिव्हिल लाईन पोलीस ठाणे गाठलं. काल रात्री उशिरा तरुणीच्या तक्रारीनंतर या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले. तर आरोपी गणेश ठाकूर हा अटक असून त्याच वाहन देखील ताब्यात घेतलं आहे.

Akola insurance agent tries to molest female manager in parked car
Bharat Bandh Today : २५ कोटी कामगार संपावर, आज भारत बंद, कोण कोणत्या सेवांवर परिणाम होणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com