
राज्यातील नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज पार पडत आहे. या शपथविधी सोहळ्यावर विरोधी पक्षातील आमदारांनी बहिष्कार टाकला. विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केला आणि ते सभागृहातून बाहेर पडले. ईव्हीएमचा निषेध म्हणून आज विरोधक शपथ घेणार नाहीत. विरोधक आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आक्रमक पवित्र्यामध्ये दिसत आहे. आदित्य ठाकरे, सुनील प्रभू, जितेंद्र आव्हाड याच्यासह महाविकास आघाडीचे सर्व आमदार सभागृहातून बाहेर पडले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आज शपथ घेणार नसल्याचे सांगितले.
विरोधी पक्षातील आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच सभागृहाचा त्याग केला. आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा होत असताना विरोधी पक्षातील आमदारांनी आज शपथ न घेण्याचे ठरवले आहे. हे सर्व आमदार सभागृहातून बाहेर पडले. या विरोधी पक्षातील आमदारांची विधानभवनात बैठक होत आहे. यै बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल असे मत आमदार सुनील प्रभू यांनी व्यक्त केले आहे.
विधानभवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विरोधकांनी आज शपथविधी न घेण्याचा निर्णय घेतला. महायुतीच्या ईव्हीएमच्या बाबत असलेल्या भूमिकेचा विरोध म्हणून विरोधकांनी हा निर्णय घेतला आहे. भास्कर जाधव यांनी यावेळी महायुतीवर जोरदार निशाणा साधला. 'हे सरकार आले आहे ते पाशवी बहुमत घेऊन आले आहे. हे पाशवी बहुमत जनतेचा जनाधार नाही. आमचा शपथेला विरोध नाही आम्ही शपथ घेऊ पण आज नाही. लोकशाही मार्गाने ईव्हीएमचा विरोध करण्यासाठी आज आम्ही शपथ घेणार नाही. ज्या पध्दतीने निकाल लागला आहे त्याला आमचा विरोध आहे.', असे मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केले.
तर दुसरीकडे, महायुतीचे सर्व नवनिर्वाचित आमदार शपथ घेत आहेत. शपथ घेण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेताच सभागृहात भाजपच्या आमदारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. एकनाथ शिंदे यांचे नाव पुकारल्यानंतर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देण्यात आल्या. तर अजित पवार यांचे नाव पुकारताच एकच दादा अजित दादा अशा घोषणा देण्यात आल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.