शिवाजी महाराज काल्पनिक नव्हते, छत्रपती शिवरायांची मंदिरं कशासाठी? संभाजी ब्रिगेडचा ठाम विरोध
Maharashtra Politics Saam tv

Maharashtra Politics : शिवाजी महाराज काल्पनिक नव्हते, छत्रपती शिवरायांची मंदिरं कशासाठी? संभाजी ब्रिगेडचा ठाम विरोध

Sambhaji Brigade on chhatrapati shivaji maharaj mandir : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावरून नवीन वाद निर्माण झालाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराला संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवलाय.
Published on

अक्षय बडवे, साम टीव्ही प्रतिनिधी

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरावरून नवा वाद निर्माण झाला आहे. उद्धव ठाकरेंनी सूरतमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्याची घोषणा केली. याच शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्याला संभाजी ब्रिगेडने विरोध दर्शवला आहे शिवाजी महाराज काल्पनिस नव्हते, तर त्यांचे मंदिर कशासाठी, असा सवाल संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी केला आहे.

संभाजी ब्रिगेड आक्रमक

संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणं म्हणजे त्यांचं दैवतीकरण करण्यासारखं आहे. मंदिर आलं की, चमत्कार आला. रयतेच्या राजाचं दैवतीकरण झालं तर भविष्यात त्यांची मूर्ती चार हाताची पाहायला मिळू शकते. यामुळे त्यांना दैवत समजून ते इतिहासात चमत्कार करत असल्याचे खोटे सांगितले जाईल. उद्धव ठाकरे, तुम्ही सरकार आल्यानंतर मंदिर बांधण्याचा संकल्प केला आहे. त्याला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे. ब.म.पुरंदरे यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी छत्रपती शिवाजी महाराजाचं चार हाताचं चित्र स्पष्ट केलं होतं. त्यावेळी संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला होता'.

 शिवाजी महाराज काल्पनिक नव्हते, छत्रपती शिवरायांची मंदिरं कशासाठी? संभाजी ब्रिगेडचा ठाम विरोध
Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

'छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम असेल तर प्रत्येक ठिकाणी शिवसृष्टी उभारा. अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचं काय झालं? त्या स्मारकाचं जे काम थांबलं आहे, त्याचा पेच निर्माण झाला आहे. तो आधी मिटवा. तुम्हाला शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करायचं आहे, त्यांचं ब्राह्मणीकरण करायचं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांना त्यांचं मंदिर स्थापन करायचं असेल, ते संभाजी ब्रिगेड खपवून घेणार नाही. तुम्ही शिवसृष्टी उभारा. त्यांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांच्या इतिहासाचं पुर्नलेखन करा, असे शिंदे पुढे म्हणाले.

 शिवाजी महाराज काल्पनिक नव्हते, छत्रपती शिवरायांची मंदिरं कशासाठी? संभाजी ब्रिगेडचा ठाम विरोध
Devendra fadnavis Exclusive interview : महायुती आणि भाजपला निवडणुकीत किती जागा मिळतील? देवेंद्र फडणवीसांनी मोजक्या शब्दात सांगितलं

'मंदिर उभारल्यानंतर एका माणसाची रोजगारहमी तयार होऊ शकते. आम्हाला ते मान्य नाही. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचं काम करणारे आणि प्रेरणा घेणारे घराघरात मावळे अपेक्षित आहेत. मंदिराला संभाजी ब्रिगेडचा विरोध असेल, असे शिंदे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com