Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका
Uddhav Thackeray Slams PM ModiSaam Tv

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

Uddhav Thackeray Criticized PM Modi: रत्नागिरीत झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि नारायण राणेंवर जोरदार हल्लाबोल केला.
Published on

ठाकरे गटाचे उमेदवार राजन साळवी यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी आज रत्नागिरीत प्रचारसभा घेतली. या सभेत बोलतांना त्यांनी पंतप्रधान मोदींनी अशुभ व्यक्ती संबोधलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळण्याच्या प्रकरणावरून त्यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. आठ महिन्यात शिवरायचा पुतळा पडतो कसा? असा सवालही उद्धव ठाकरेंनी यावेळी पुन्हा एकदा केला.

सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यावरुन उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर टीका केलीय. अशुभ हातांनी पुतळ्याचं अनावरण झालं होतं त्यामुळेच पुतळा पडला असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. आठ महिन्यांपुर्वी बांधलेला पुतळा पडतो तरी कसा असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. या प्रकरणावरून पंतप्रधान मोदींनी माफी मागितील, मात्र त्यात गुर्मी होती . महाराष्ट्र हा पाय पुसणं नाहीये.

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका
Uddhav Thackeray: लाडकी बहीण ते महागाई, भाजप ते महायुती; उद्धव ठाकरेंची कोल्हापुरातील भाषणातून तुफान फटकेबाजी

हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे, तो तुम्हाला पुसून टाकेल. मागे सुद्धा माजी राज्यपा कोश्यारी यांनी छत्रपती महाराज यांचा अपमान केला होता. त्यावेळी आम्ही मोर्चा काढला. परंतु राज्यपालावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यांना हटवण्यात आलं नाही. कारण काय छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाला होता. मात्र पंतप्रधान मोदींचा अपमान केला असता तर तुमच्या घरात पोलीस घुसवले असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com