Maharashtra Assembly Election: कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार के.पी. पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आज आदमापुर इथं सभेचं आयोजन करण्यात आले आहे. या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी थेट महायुती सरकारवर हल्लाबोल केला. 'खोते सरकारला भस्म करण्याचा क्षण आता आला आहे.', असे म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला. यासोबत लाडकी बहीण योजना, महागाई, भाजप आणि महायुतीवर उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून टीकेचा भडीमार केला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाषण करताना सांगितले की, 'तुमच्या मनात एक राग आहे. हा राग गेली अडीच वर्षे आपल्या मनात धगधगत ठेवला होता. खोते सरकारला भस्म करण्याचा क्षण आता आला आहे. कोल्हापूरच्या विजयाची जबाबदारी आता सतेज पाटील यांच्याकडे देतो. मी माझ्यासाठी लढत नाही तर महाराष्ट्रासाठी लढतोय. मी त्यांच्याबरोबर जाऊ शकलो असतो. त्यांना ५० खोके दिले. मी जर अख्खी शिवसेना घेऊन गेलो असतो तर गोदाम कमी पडलं असतं. पण गद्दारी माझ्या रक्तात नाही.'
'न्याय देवेतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली. त्या न्यायदेवतेला आपल्या देशातील लोकशाही महरतेय हे कळत नाही.मी तुमच्यासाठी, राज्यासाठी मी लढतोय.सर्व समाज आज तोडून फोडून टाकले आहेत. संपूर्ण राज्य अदानींना विकलाय. इथलं पाणी अदानीला विकलं असं जेव्हा सांगितलं तेव्हा मला धक्का बसला. चंद्रपूरची शाळा अदानीला दिली जाते. संपूर्ण महाराष्ट्र जणू अदानीला फुकट दिला जातो, विकला जातोय. आम्ही काय बघत बसणार काय? जो कोणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष महाराष्ट्राला विकण्यासाठी मदत करतोय तो शत्रू आहे असं मी जाहीर सांगतोय.', असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
राज्य सरकारवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, 'आपला महाराष्ट्र शाहू, फुले, आंबेडकरांचा आहे. मी इथं नन्नाचा पाढा लावायला आलो नाही. जे अडीच वर्षे महाराष्ट्र भोगत आहे, ते व्यक्त करायला आलोय. शिवाजी महाराजांचा पुतळा पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन व्हायला पाहिजे यासाठी अट्टाहास केला आणि तो आठ महिन्यांत कोसळतो. कोल्हापूरचे रस्तेसुद्धा किती कोटी आणले. हे सरकार टक्केवारीचं, खोके सरकार आहे.' तसंच, 'निवडणूक जवळ आल्यावर तुम्हाला बहीण दिसायला लागली. बदलापूरमध्ये बालिकांवर अत्याचार झाल्यानंतर तिथले निर्ढावलेले पोलिस त्या पीडितांच्या आईची तक्रार घ्यायला टाळाटाळ करत होते. या योजनेमुळे कुणाचे घर चालत असेल तर कुणी हात वर करून सांगाल तर मी महायुतीच्या विरोधात एकही उमेदवार उभा करणार नाही.', असे चँलेंज उद्धव ठाकरे यांनी सरकारला केले आहे.
तसंच, 'महाविकास आघाडीचं सरकार आणणार म्हणजे आणणारच. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचं मंदिर उभारणार, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. 'आमचं दैवत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळीला मशालगीत होतं. तुमच्याकडे वाजलं नसेल, कारण शाहू महाराज स्वतः उमेदवार होते. तुम्ही माझ्यावर कारवाई करा, महाराष्ट्र तुमच्यावर कारवाई करेल.', असा इशारा उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारला दिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.