भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी; संतापलेल्या महिलेनं थेट गिरीश महाजनांना सुनावलं| Video

Mumbai Jam Woman Sparks Anger: मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली. यामुळे एका महिलेने मंत्री गिरीश महाजन यांना सुनावलंय. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Mumbai Jam Woman Sparks Anger:
A woman confronts BJP leader Girish Mahajan amid heavy traffic during a protest in Mumbai.saam tv
Published On
Summary
  • मुंबईत भाजप आंदोलनामुळे वाहतूक कोंडी

  • संतापलेल्या महिलेनं गिरीश महाजन यांना सुनावलं

  • वरळी डोम कार्यक्रमादरम्यान घटना

लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरली आहे. रस्त्यावर उतरून विरोधकांच्या विरोधात आंदोलन करू लागली आहे. मात्र गल्ली ते दिल्ली आंदोलन छेडण्यात आले आहे. मुंबईतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील पत्रकार परिषद घेत २०२९ मध्ये हे विधेयक मंजूर होईल असे म्हटले. तसेच विधेयक नामंजूर होण्यास विरोधकांना जबाबदार धरलं.

आज मुंबईतील वरळी डोम येथे भाजप महायुतीच्यावतीने जन आक्रोश महिला संमेलनाचे आयोजन करण्यात आलं, मात्र, याच संमलेनासाठी जाताना आंदोलकांकडून वाहतूक कोंडी झाली. यामुळे एका महिलेनं चक्क मंत्री गिरीश महाजन यांनाच खडेबोल सुनावले आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मुंबईत भाजपकडून महिलांच्या सन्मानासाठी काढण्यात आलेल्या मोर्चावेळी वाहतूक कोंडी झाली.

Mumbai Jam Woman Sparks Anger:
Maharashtra MLC Election: विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस देणार उमेदवार; 'या' नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना जाण्यासाठी आणि येण्यासाठी वाट मिळत नव्हती. त्यामुळे त्यांना उशीर झाला, ताटकळत बसावे लागले. यामुळे एक संतप्त झालेल्या महिलेनं थेट मोर्चास्थळी जाऊन मंत्री महाजन यांना सुनावलं. यावेळी महिला आणि पोलिसांमध्ये देखील वाद झाल्याचं दिसून आले आहे.

Mumbai Jam Woman Sparks Anger:
पंतप्रधान मोदींनी शरद पवार यांच्या खासदारावर दिली मोठी जबाबदारी, नेमका काय घेतला निर्णय?

महिलेनं मंत्री महाज यांच्यापुढे संताप व्यक्त करत, शेकडो लोक आपल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीत अडकल्याचं सांगितलं. विरोध करायचाच तर तो मैदानात करा. वाहतूक कोंडी का करत आहात? असा प्रश्न करत महिलेने महाजनांना सुनावले. महिलेचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून विरोधकांकडूनही शेअर केला जातोय. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी देखील या व्हिडिओचा संदर्भ देत भाजपच्या आंदोलनावर टीका केली आहे.

सोशल पोस्टमधून रोहित पवारांची कोपरखळी

अनेक लोकांना आरोग्याच्या अडचणी असतात, अशा परिस्थितीत केवळ केंद्रातून आदेश आलेत म्हणून आणि His Masters Voice ला खूष करण्याच्या प्रयत्नात एखादा पक्ष लोकांना तीन-तीन तास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवत असेन तर त्याची जोरदार रिॲक्शन मिळणारंच. अशाच एका संतप्त महिलेचा मुंबईतील व्हिडिओ बघायला मिळाला. आंदोलनाचं कारण सत्य असेल तर लोकं समजून घेतात. पण, खोट्यासाठी लोकांना वेठीस धरलं जात असेल तर लोक तोंडावर कशी फजिती करतात, हेच या व्हिडिओतून दिसतं, असे आमदार रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com