Maharashtra MLC Election: विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेस देणार उमेदवार; 'या' नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

Legislative Council Election: महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत उमेदवारीवरून चर्चा सुरू आहे. आगामी निवडणुकीत आघाडीची रणनीती आणि उमेदवार निश्चित करण्यासाठी ही चर्चा महत्त्वाची आहे.
Congress News
MVA leaders hold discussions over candidate selection for Maharashtra Legislative Council elections.Saam tv
Published On
Summary
  • महाविकास आघाडीत उमेदवारीवरून चर्चा सुरू

  • विधानपरिषद निवडणुकीसाठी रणनीती आखली जात आहे

  • उमेदवार निश्चित करण्यासाठी चर्चा सुरू आहे.

विधानसभा पोटनिवडणुकीचा उडालेला धुरळा उडाला आहे. आता विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभेतील सध्याचे पक्षीय बलाबल पाहता सत्ताधारी महायुतीचे पारडे जड दिसत आहे. या ९ जागांपैकी तब्बल ८ जागा महायुती सहज जिंकेल. यात भाजप ५, शिवसेना २, आणि राष्ट्रवादी काँग्रेसची १ जागा निवडून येईल.

Congress News
Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

तर महाविकास आघाडीकडे ४६ आमदार आहेत. त्यामुळे त्यांचा एक उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. या जागेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दावा केलाय. मात्र उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेची निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. पण ठाकरे गटाने जागेवर दावा केला आहे, परंतु काँग्रेसने उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवावी अशी अट घातली आहे. मात्र ठाकरे ही निवडणूक लढण्यास उत्सुक नाहीये.

Congress News
"पंतप्रधान मोदी दहशतवादी आहेत...", मल्लिकार्जुन खरगे यांचं वादग्रस्त वक्तव्य

उद्धव ठाकरे विधान परिषदेतील माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना नावासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. काँग्रेस मात्र दानवेंच्या नावाला विरोध केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळेच काँग्रेसमधून एका नेत्याच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे निवडणूक लढणार नसतील तर ही जागा काँग्रेसने मागितली आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात ही निवडणूक लढवतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे. महाविकास आघाडीत सुरु असलेल्या या घडामोडींमुळे विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट आलाय.

दरम्यान निवृत्त होणाऱ्या सदस्यांमध्ये ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचा समावेश आहे. शिवसेनेच्या वाट्याला २ जागा येत असून त्यासाठी नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com