अमित शाहांची महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा! 1500 कोटींचे पॅकेज; टॅक्सीचालकांसाठी ही घेतला निर्णय

Bharat Taxi Launched in Pune: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यात भारत टॅक्सी सेवेचा प्रारंभ केला. तळेगावच्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग सहकारी संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी दीड हजार कोटींचे सहाय्य जाहीर केले. पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालयही सुरू करण्यात आले.
Amit Shah announces ₹1500 crore for National Heavy Engineering Cooperative
Amit Shah announces ₹1500 crore for National Heavy Engineering Cooperativesaam tv
Published On: 

महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा समृद्ध वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असून, देशाच्या पश्चिम विभागातील सहकारी संस्थांना मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी पुण्यात सहकार मंत्रालयाचे पश्चिम विभागीय कार्यालय सुरू करण्यात येत आहे. तळेगाव येथील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही बहुराज्य सहकारी संस्था दीड हजार कोटी रुपयांच्या वित्तीय सहाय्याने पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सहकारी तत्त्वावर आधारित आणि कमिशनविरहित ‘भारत टॅक्सी’ सेवेमुळे टॅक्सीचालकांना केवळ चालक न राहता स्वतःच्या सेवेचे मालक होण्याची संधी मिळणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शाह यांनी केले.

Amit Shah announces ₹1500 crore for National Heavy Engineering Cooperative
अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, परदेश दौरे बंद करा, गावोगावी फिरा, तरच नंबर लागेल

तळेगाव येथे नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या बहुराज्य सहकारी संस्थेच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे भूमिपूजन, पुण्यात सहकारी संस्थांचे केंद्रीय निबंधक (सीआरसीएस) यांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पुण्यासाठी ‘भारत टॅक्सी’ सेवेच्या प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार संजय (बाळा) भेगडे तसेच केंद्रीय सहकार सचिव आशिषकुमार भुटानी उपस्थित होते.

Amit Shah announces ₹1500 crore for National Heavy Engineering Cooperative
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! दोन पिस्तूल, १९ काडतुसे अन् बिश्नोई गँग...; लांडगे कुटुंबीयांनी काय सांगितलं?

नॅशनल हेवी इंजिनिअरिंग संस्थेच्या पुनरुज्जीवनातून सहकाराला औद्योगिक बळ

केंद्रीय गृहमंत्री शाह म्हणाले, तळेगाव येथील बंद पडलेली नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेड ही महत्त्वाची बहुराज्य सहकारी संस्था पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संस्थेच्या पुनरुज्जीवनासाठी दीड हजार कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य आयडीएमसी आणि इतर वित्तीय संस्थाकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून, या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर २०२७ मध्ये उत्पादन सुरू होईल. सहकाराच्या माध्यमातून औद्योगिक व आर्थिक उपक्रमांना चालना देण्याच्यादृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Amit Shah announces ₹1500 crore for National Heavy Engineering Cooperative
Pune : इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, उड्डाण करताच तांत्रिक बिघाड; १९२ प्रवाशांचा जीव टांगणीला

या संस्थेमध्ये सहकारी साखर कारखाने, इथेनॉल प्रकल्प आणि दूध डेअरी यांना आवश्यक असणारी यंत्रसामग्री तयार केली जाणार आहे. त्यामुळे सहकारी संस्थांना लागणारी यंत्रसामग्री देशातच उपलब्ध होण्यास मदत होईल. सहकार क्षेत्राची औद्योगिक क्षमता वाढण्याबरोबरच रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील. सहकारी संस्थांनी केवळ पारंपरिक व्यवसायांपुरते मर्यादित न राहता औद्योगिक उत्पादन क्षेत्रातही पुढाकार घ्यावा, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.

Amit Shah announces ₹1500 crore for National Heavy Engineering Cooperative
Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

पश्चिम विभागीय कार्यालयामुळे सहकारी संस्थांना प्रशासकीय सेवा सुलभ

पुण्यात सुरू करण्यात आलेल्या सहकारी संस्थांच्या केंद्रीय निबंधकांच्या पश्चिम विभागीय कार्यालयाबाबत बोलताना श्री. शाह म्हणाले, बहुराज्य सहकारी संस्थांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच प्रशासकीय व नियामक सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे कार्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या कार्यालयामुळे सहकारी संस्थांच्या नोंदणीसह विविध प्रशासकीय कामकाजात सुलभता येईल. संस्थांच्या कामकाजातील पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल. सहकारी संस्थांना त्यांच्या अडचणींसाठी दूरवर जावे लागणार नाही, तर पश्चिम विभागातील संस्थांना स्थानिक पातळीवरच आवश्यक मार्गदर्शन आणि सेवा मिळू शकतील.

महाराष्ट्राच्या भूमीत विठ्ठलराव विखे पाटील, वैकुंठभाई मेहता यांच्यासारख्या सहकारमहर्षींनी सहकाराची मुहूर्तमेढ रोवून ही चळवळ रुजविली. महाराष्ट्राला सहकार क्षेत्राची मोठी परंपरा लाभली आहे. या परंपरेचा उपयोग देशातील सहकारी चळवळ अधिक सक्षम करण्यासाठी होणे आवश्यक आहे. पुण्यातील हे कार्यालय त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘भारत टॅक्सी’मुळे सारथीच होणार सेवेचा मालक

‘भारत टॅक्सी’ सेवेच्या प्रारंभाबाबत शाह म्हणाले, सहकाराच्या तत्त्वावर आधारित परिवहन सेवा विकसित करण्याच्यादृष्टीने हा उपक्रम महत्त्वाचा आहे. या सेवेत टॅक्सीचालक म्हणजेच सारथी यांचा सहभाग, मालकी हक्क आणि आर्थिक भागीदारी यांना प्राधान्य देण्यात आले आहे. पारंपरिक टॅक्सी सेवांमध्ये चालकांना मिळणाऱ्या उत्पन्नातून विविध प्रकारचे कमिशन द्यावे लागते. मात्र, सहकारी तत्त्वावर आधारित भारत टॅक्सीच्या माध्यमातून सारथींना त्यांच्या सेवेवर मालकी हक्क मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या व्यवस्थेमुळे चालकांना आर्थिक लाभ मिळण्याबरोबरच प्रवाशांनाही वाजवी दरात सेवा उपलब्ध होण्यास मदत होईल. सहकारी व्यवस्थेत सदस्यांचा प्रत्यक्ष सहभाग आणि मालकीची भावना दृढ करण्याच्यादृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.