Bomb Threat : CSMT रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी; मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

Bomb Threat Mumbai CSMT Railway Station : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने पोलिसांची धावपळ. BDDS आणि श्वान पथकाकडून अडीच तास तपासणी; मात्र स्फोटक आढळले नाही.
Mumbai CSMT Railway Station Bomb Threat
Mumbai CSMT Railway Station Bomb Threat AI Image
Published On: 
Summary
  • मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानकाला बॉम्बने उडवण्याची धमकी

  • १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६:५० वाजता डायल ११२ वर धमकीचा फोन आला

  • अज्ञात व्यक्तीने रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवणार असल्याचे सांगितले

  • पोलिसांनी तातडीने श्वान पथक आणि BDDS पथकाला घटनास्थळी पाचारण केले

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) रेल्वे स्थानक बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने शनिवारी पोलिस यंत्रणेत खळबळ उडाली. डायल ११२ या आपत्कालीन क्रमांकावर फोन करून एका अज्ञात व्यक्तीने रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवणार असल्याचे सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संपूर्ण परिसराची तपासणी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून ५० मिनिटांच्या सुमारास मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला हा धमकीचा फोन आला. ९४२०११२६५५ या मोबाईल क्रमांकावरून फोन करणाऱ्या व्यक्तीने CSMT रेल्वे स्थानकात बॉम्ब ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली. या फोनमुळे रेल्वे स्थानक परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला.

Mumbai CSMT Railway Station Bomb Threat
Ladli Behna Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

धमकीची माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न घालवता तपासणी सुरू केली. यासाठी श्वान पथक तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला (BDDS) घटनास्थळी बोलावण्यात आले. या पथकांनी रेल्वे स्थानकातील विविध भागांची काळजीपूर्वक तपासणी केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. सुमारे अडीच तास ही तपासणी सुरू होती. रात्री ९ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास तपासणी पूर्ण करण्यात आली. मात्र, या संपूर्ण शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना कोणतीही बॉम्बसदृश्य वस्तू किंवा स्फोटक पदार्थ आढळून आला नाही.

Mumbai CSMT Railway Station Bomb Threat
Bribe Case : रायगडमध्ये खळबळ! सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं; गुन्हा दाखल

या कारवाईबाबत लोहमार्ग पोलिसांनी मुख्य नियंत्रण कक्षाला माहिती दिली आहे. दरम्यान, ज्या मोबाईल क्रमांकावरून हा धमकीचा फोन करण्यात आला, त्या व्यक्तीचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. हा फोन नेमका कोणी केला आणि त्यामागे काय उद्देश होता, याचा तपास पोलीस करत आहेत. मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाला अशा प्रकारे धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.