Bribe Case : रायगडमध्ये खळबळ! सरकारी अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडलं; गुन्हा दाखल

Raigad Pen Bribe Case Update News : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. निवासी करारनामा करून देण्यासाठी ५० हजारांची लाच स्वीकारल्याच्या आरोपावरून दुय्यम निबंधक प्रशांत आबाजी जगदाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल.
Raigad Bribe Case
Raigad Bribe Case Saam Tv
Published On: 
Summary
  • रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

  • दुय्यम निबंधक प्रशांत आबाजी जगदाळे यांच्यावर ५० हजारांची लाच मागितल्याचा आरोप

  • निवासी करारनामा करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याची तक्रार

  • तक्रारदाराने ठाणे एसीबी युनिटकडे केली होती तक्रार

रायगड जिल्ह्यातील पेण येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. निवासी करारनामा करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या दुय्यम निबंधकाला लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. प्रशांत आबाजी जगदाळे असे या अधिकाऱ्याचे नाव असून, पेण येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात दुय्यम निबंधक श्रेणी १ आणि मुद्रांक निरीक्षक म्हणून कार्यरत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका इमारतीतील सदनिकाधारकाला निवासी करारनामा करून घ्यायचा होता. या कामासाठी प्रशांत जगदाळे यांनी संबंधित व्यक्तीकडे पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. करारनामा करण्याच्या कामासाठी त्यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचे तक्रारीतून समोर आले. संबंधित व्यक्तीला लाचेची मागणी मान्य नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे युनिटकडे तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत विभागाने प्रकरणाची पडताळणी केली. त्यानंतर अधिकाऱ्यांना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला.

Raigad Bribe Case
Earthquake : बुलढाणा-जळगाव परिसरात भूकंपाचे तीव्र धक्के; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची घराबाहेर पळापळ

ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्रशांत जगदाळे यांना रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पेणमधील शासकीय कार्यालयात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रशांत आबाजी जगदाळे यांच्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ठाणे युनिटने ही कारवाई केली.

Raigad Bribe Case
Blood Sugar:  शुगर कंट्रोल करण्याचा सर्वात सोपा उपाय! रात्री खोलीत 'ही' एक गोष्ट , रक्तातील साखर राहील एकदम नॉर्मल

शासकीय कामासाठी नागरिकांकडून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई केली जाते. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सरकारी कार्यालयांमधील लाचखोरीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.