टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा ट्विस्ट! दोन पिस्तूल, १९ काडतुसे अन् बिश्नोई गँग...; लांडगे कुटुंबीयांनी काय सांगितलं?

Tiger Shroff Firing Case Latest Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गणेश लांडगेच्या कुटुंबीयांनी पोलिसांचे आरोप फेटाळले आहेत. गणेशचा बिश्नोई गँगशी संबंध नसल्याचा दावा करत आग्रीपाडा कारवाई आणि पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
TIGER SHROFF FIRING CASE
TIGER SHROFF FIRING CASEsaam tv
Published On: 

विकास काटे, साम टीव्ही

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने ठाण्यातील गणेश लांडगे याला मुंबईच्या आग्रीपाडा परिसरातून अटक केली होती. या कारवाईत दोन गावठी पिस्तूल आणि १९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. मात्र आता गणेश लांडगेच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. गणेशचा बिश्नोई गँगशी किंवा टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप खांबे यांनीही पोलिसांच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

TIGER SHROFF FIRING CASE
Rupali Chakankar : माझे नाव, फोटो किंवा ओळख वापराल तर खबरदार! रुपाली चाकणकर यांचा कडक इशारा

मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट २ ने टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणाच्या तपासादरम्यान ठाण्यातील गणेश लांडगे याला मुंबईच्या आग्रीपाडा परिसरातून अटक केली होती. गणेशकडून दोन गावठी पिस्तूल आणि १९ जिवंत काडतुसे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.मात्र या कारवाईनंतर आता लांडगे कुटुंबीय आक्रमक झाले आहेत. टायगर श्रॉफ गोळीबार झाला त्या दिवशी गणेश हा छोट्या भांडणाच्या गुन्ह्यात तुरुंगात होता. ३१ तारखेला तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो मुंबईत गेला होता. माझ्या मुलाचा बिश्नोई गँगशी किंवा गोळीबार प्रकरणाशी काहीही संबंध नाही.

TIGER SHROFF FIRING CASE
Pune : इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, उड्डाण करताच तांत्रिक बिघाड; १९२ प्रवाशांचा जीव टांगणीला

पोलिसांकडून खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप गणेशच्या आईने केला आहे.दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संदीप खांबे यांनीही पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. गणेश हा सराईत गुन्हेगार किंवा कोणत्याही गँगचा सदस्य नसल्याचा दावा करत,उद्या त्याचा चकमकीत मृत्यू झाल्यास त्याला पोलीस आणि गृहमंत्री जबाबदार असतील,असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणातील आग्रीपाडा कारवाईनंतर आता गणेश लांडगेच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या भूमिकेमुळे या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.