Rupali Chakankar : माझे नाव, फोटो किंवा ओळख वापराल तर खबरदार! रुपाली चाकणकर यांचा कडक इशारा

Rupali Chakankar News : रुपाली चाकणकर यांनी नाव, फोटो आणि व्यक्तिमत्त्वाचा पूर्वपरवानगीशिवाय वापर करणाऱ्यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
Rupali Chakankar News
Rupali Chakankar News AI image
Published On: 
Summary
  • रुपाली चाकणकर यांनी नाव, फोटो आणि वैयक्तिक ओळखीच्या अनधिकृत वापराविरोधात कठोर भूमिका

  • पूर्वपरवानगीशिवाय त्यांच्या नावाने चित्रपट, व्हिडिओ, रील किंवा जाहिरात तयार करू नये, असे त्यांनी स्पष्ट केले

  • अनधिकृत वापर करणाऱ्यांविरोधात दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्याचा इशारा

माझे नाव, फोटो किंवा वैयक्तिक ओळख परवानगीशिवाय वापरल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिला आहे. आपल्या नावाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा वापर करून कोणताही चित्रपट, व्हिडिओ, रील किंवा जाहिरात तयार करू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करून त्यांनी आपली भूमिका मांडली.

रुपाली चाकणकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणत्याही व्यक्तीने त्यांचे नाव, फोटो, ओळख किंवा स्वतःला सादर करण्याची विशिष्ट शैली व्यावसायिक अथवा वैयक्तिक फायद्यासाठी वापरू नये. तसेच या गोष्टींचा वापर करून चित्रपट, व्हिडिओ, रील, टीझर, प्रमोशनल साहित्य किंवा अन्य कोणताही कंटेंट तयार करणे आणि प्रसिद्ध करणे चुकीचे आहे.

Rupali Chakankar News
Ladli Behna Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! १५०० रुपये महिलांच्या खात्यात जमा; मुख्यमंत्र्यांची घोषणा

असे प्रकार घडल्यास संबंधितांविरोधात दिवाणी आणि फौजदारी कारवाई केली जाईल. तसेच आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्याची मागणीही केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणामुळे रुपाली चाकणकर चर्चेत आल्या. भोंदू बाबा अशोक खरातशी संबंधित प्रकरणात चाकणकर यांचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

या प्रकरणातील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. याच पार्श्वभूमीवर 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात अभिनेत्री दिपाली सय्यद भूमिका साकारत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आपल्या नावाचा किंवा व्यक्तिमत्त्वाचा वापर होऊ नये, यासाठी चाकणकर यांनी हा इशारा दिल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.