गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई लोकल ट्रेनमध्ये सुरु असलेले अपघात थांबण्याचं नाव घेत नाही. नेव्हीमध्ये जाण्याची इच्छा असलेल्या अवघ्या १७ वर्षीय मुलाचा कसाराजवळ लोकल ट्रेनमधून पडून झाला आहे. मृत्यू झालेला मुलगा आपल्या आईसोबत कळव्याहून त्याच्या मूळ गावी जात होता. पीडित मुलाची आई घडलेल्या घटनेमुळे शॉकमध्ये असल्याने या घटनेची संपूर्ण माहिती मिळू शकलेली नाही. या संपूर्ण अपघाताचा तपास कल्याण पोलिस करत असून अन्य प्रत्यक्षदर्शींना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशन रंगनाथ इडे असे मृत मुलाचे नाव असून तो कळव्यातील एका शाळेत दहावीत शिकत होता. शनिवार १५ जून रोजी रोशन आणि त्याची आई कसारा येशील एका कॉलेजमध्ये(college) नावनोंदणी करणार होते. जिथे नेव्ही भरती होण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.
त्यानुसार रोशन आणि त्याची आई कळव्याहून सकाळी सहाच्या सुमारास कसाराकडे जाणाऱ्या लोकल(Local) ट्रेनमध्ये चढले. रोशनकडे अनेक पिशव्या असल्याने तो सामानजवळ फूटबोर्डवर उभा राहिला तर त्याची आई आत उभी होती. स्टेशन आले की नाही हे पाहण्यासाठी रोशन ट्रेनमधून बाहेर पडला मात्र त्याची बाहेर असलेल्या खांबाला जोरदार धडक बसली आणि तो खाली पडला, त्याला त्यात गंभीर दुखापत झाली.
'रोशन खाली पडताच इतर प्रवाशी घटनास्थळी पोहचले आणि त्याला तात्काळ रुग्णालयात नेले. मात्र रोशनची प्रकृती चिंताजनक असल्याने नंतर त्याला नाशिक जिल्हा ग्रामीण रुग्णालयात(hospital) दाखल करण्यात आले मात्र नंतर रोशनचा मृत्यू झाला',असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.
रोशनच्या वडिलांकडून तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. रोशनला कसारा येथून नाशिकच्या रुग्णालयात नेण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागला. मात्र त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत (injury) झाल्याने तो वाचू शकला नाही. आईच्या डोळ्यासमोर मुलाचा मृत्यू झाल्याचा झटका त्याच्या आईला सहन झाला नाही,त्यामुळे त्याच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे,असे रोशनच्या वडिलांनी सांगितले
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.