Mumbai Local Train News: लोकल गर्दीचा २४ वा बळी; मुंब्रा ते दिवा स्थानकादरम्यान ट्रेनमधून पडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Train News: मुंबईतील लोकल ट्रेनमधून पडून आणखी एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी घडली.
mumbai local train news
Mumbai Local NewsSaam TV

कल्याण :

धावत्या लोकल ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याते सत्र सुरूच असल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी सकाळी पुन्हा एका प्रवाशाचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. २०२४ वर्षामधील जानेवारी ते जून महिन्यातील ही चोवीसावी घटना घडल्याची माहिती आहे.सतत घडणाऱ्या घटनेमुळे लोकल प्रवासाविषयी प्रत्येकाला चिंता वाटू लागली आहे.

mumbai local train news
Mumbai BMC News: वेसावेतील सागरी किनारा क्षेत्रात अनधिकृत बांधकाम; दुय्यम अभियंता सोमेश शिंदे यांचं निलंबन

मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या डोंबिवली(dombivali) ते ठाणेदरम्यान पुन्हा एकदा एका तरुणाचा पडून मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी ३८ वर्षीय मयत केयूर सावला हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जात होता. त्यासाठी केयूरने डोबिंवली रेल्वे स्थानकावरुन जलद लोकल पकडली. मात्र डब्यात आत जाता नाही आले म्हणून तो दरवाजाला लटकून प्रवास करत होता. जलद लोकल काही वेळात दिवा स्थानकावर जाणार त्याचवेळी केयूरचा हात निसटला आणि तो धावत्या ट्रेनमधून खाली पडला.

या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. केयूरला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संबंधित घटनेची माहिती केयूरच्या कुंटुबियांना देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या (Mumbai)लोकल ट्रेनमध्ये सुरु असलेल्या अपघांताची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. काही दिवसांपूर्वेतील वास्तव्यास असणाऱ्या रिया या २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला होतो. रिया ठाण्यातील एका कन्स्ट्रक्शन कार्यालयात कार्यरत होती. त्या दिवशीही तिने ठरलेली लोकल पकडली मात्र दिवा स्थानका दरम्यान धावत्या ट्रेनमधून पडून तिचा मृत्यू होता.

mumbai local train news
Mumbai Election Results 2024: मुंबई ठाकरेंची की शिंदेंची? महापालिकेचे चित्र आजच होणार स्पष्ट; 6 जागांचे निकाल ठरवणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com