Sangli News: पहिल्याच पावसात पूल वाहून गेला, शाळा-कॉलेज गाठण्यासाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; नागरिकांमध्ये संताप VIDEO

Heavy Rain Bridge Swept In Miraj: सांगलीमध्ये पावसामुळे पूल वाहून गेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.
पावसामुळे पूल वाहून गेला
eavy Rain Bridge Swept In MirajSaam Tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही सांगली

सांगलीमध्ये पहिल्याच पावसात दाणादाण उडाली आहे. पहिल्याच मुसळधार पावसात जिल्ह्यातील मिरज पूर्व भागातील ओढ्यावरील पूल वाहून गेला आहे. ओढ्यावरील पाणंद रस्ता वाहून गेल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. तसेच शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिरज पूर्व भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नाले ओढ्यांना पूर आला (Sangli News) आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ओढ्यांवरील पुल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मिरज मालगाव दिंडी वेस येथील मिरज ओढ्यावरील पुल वाहून गेल्यामुळे सद्या पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. त्याचप्रमाणे रुईकर पानंद रस्त्यावरील ओढ्यावरील पुल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करत आहे.

रुईकर पानंदडे जाणाऱ्या पुलाचे रस्त्याचे काम गेले तीन वर्षे सुरू (Rain Bridge Swept In Miraj) आहे. परंतु पूर आल्यामुळे या ठिकाणी टाकलेली भर आणि पाईप वाहून गेले आहेत. मोठी वाहतूक जरी बंद असली तरी शाळा, महाविद्यालयीन तरुण सायकलने या मार्गावर जीव मुठीत धरून प्रवास करताना दिसतात. सांगलीत पहिल्याच मुसळधार पावसात मोठी दाणादाण उडाली आहे.

पावसामुळे पूल वाहून गेला
Sambhajinagar Rain : बारा दिवसात १४ जणांचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह वीज कोसळल्याच्या घटना

सुमारे दीडशे कुटुंब या पाणंद रस्त्यावर राहत आहेत. पूल वाहून गेल्याने पांगळे मळा, धुळूबुळू मळा, कोरे मळा, बरगाले मळा, रुईकर मळा येथील विद्यार्थ्यांची गैरसोय होत (Sangli Rain) आहे. ओढ्यावरील पुल केव्हा होणार? असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी केला आहे. प्रत्येक वेळी अर्धवट काम करतात, पाऊस झाला की पूल वाहून जात असल्याचा आरोप या भागातील विद्यार्थ्यांकडून होत (Bridge Swept) आहे.

पावसामुळे पूल वाहून गेला
Mumbai Rain Updates : मुंबईकरांसाठी पुढील ३-४ तास महत्वाचे; विजांचा कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com