Pune Porsche Car Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण; ससून रुग्णालय चौकशी समितीला 'ब्ल्यू नाईल' बिर्याणीची मेजवानी

Pune Porsche Car Accident Update : पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातातील अल्पवयीन मुलाची चौकशी सुरू आहे. ससूनमध्ये घेण्यात आलेल्या त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार झाले असून चौकशी समितीला आज बिर्याणीची मेजवाणी मिळाल्याची चर्चा आहे.
Pune Porsche Car Accident
Pune Porsche Car AccidentSaam Digital

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल फेरफार केल्याप्रकरणी ससूनच्या दोन डॉक्टरना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची आज ससून रुग्णालय चौकशी समितीने पुण्यातील प्रसिद्ध ब्ल्यू नाईल बिर्याणीवर ताव मारत चौकशी केली. रुग्णालयाचे डिन डॉ. विनायक काळे यांच्या केबिनमध्ये बिर्याणीच्या बॅगा आढळून आल्यात आहेत. या बिर्याणी मेजवाणीची चर्चा सध्या पुणे आणि राज्यात रंगल्या आहेत.

ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणाची चौकशी करण्यासठी राज्य सरकारने तीन जणाची समिती नेमली आहे.यामध्ये पल्लवी सापळे,डॉ सुधीर चौधरी आणि डॉ गजानन चव्हाण हे आज चौकशीसाठी ससून ला पोहचले होते. आज त्यांनी जवळपास ८ तास चौकशी केली त्याचा अहवाल राज्य सरकारला देणार पाठवला जाणार आहे.

ससूनमध्ये नेमकं काय झालं

समितीकडून आपत्कालीन कक्षात जाऊन पाहणी केली.

अल्पवयीन मुलाला ससूनच्या ज्या कक्षात आणलं होतं त्याची पाहणी केली.

मेडिकल चेकअपची प्रोसिजर फॉलो करताना त्या मुलाची नोंदणी ज्या रजिस्टर मध्ये केली होती,त्यांच्या नोंदी घेतल्या.

ज्या बेडवर त्याचे रक्ताचे नमुने घेतले, त्या बेडची,कक्षाची आणि तिथल्या सीसीटीव्हीची पाहणी केली

ब्लड लॅबची केली पाहणी

ससून रुग्णालय चौकशी समितीने जवळपास 8 तास चौकशी केली

ससून रुग्णालय डिन डॉ विनायक काळे यांच्या केबिनमध्ये सुरू होते कामकाज

समितीकडून ससून रुग्णालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह ब्लड लॅबच्या कर्मचाऱ्यांची करण्यात आली चौकशी

Pune Porsche Car Accident
Kirti Vyas Case: मृतदेह मिळाला नाही, फक्त एका पुराव्यामुळं कीर्ती व्यासच्या हत्येचं गूढ उकललं

चौकशी समितीवर विश्वास नाही: वडेट्टीवार

पुणे ‘हिट अँड रन‘ प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या SIT च्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्या चौकशीवर जनतेचा विश्वास नाही असा आरोप विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केला आहे. तसंच या पूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी झाली पाहिजे ही महाराष्ट्रातील जनतेची मागणी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Pune Porsche Car Accident
Akola News : सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न; काही तासातचं मोठी कारवाई, सापडलं मोठं घबाड

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com