Mumbai Local Train News: लोकलगर्दी आणि जीवघेणा प्रवास! रेल्वे प्रवाशांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमधून...

Exclusive Interview with CPRO of Central Railway Dr. Swapnil Nilla: अपघात रोखण्यासाठी रेल्वेने लघुकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना आखल्याची माहिती डॉ. नीला यांनी दिली.
Mumbai Local Train News: लोकलगर्दी आणि जीवघेणा प्रवास! रेल्वे प्रवाशांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमधून...
CPRO of Central Railway Dr. Swapnil Nilla on Mumbai Local Train Accidents and SolutionSaam tv
Published On

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर रेल्वेतून पडून अपघात आणि मृत्यूमुखी होण्याऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या दोन महिन्यात ठाणे ते डोंबिवलीदरम्यान रेल्वेतून पडून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे प्रवाशांमध्ये रेल्वे प्रवासाची भीती निर्माण झाली आहे. या रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या वाढत्या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी रेल्वेने काही उपायोजना हाती घेतल्या आहेत. त्याविषयी मध्य रेल्वेचे मु्ख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्निल नीला यांनी महत्वाची माहिती दिली आहे. अपघात रोखण्यासाठी रेल्वेने लघुकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना आखल्याची माहिती डॉ. नीला यांनी दिली.

Mumbai Local Train News: लोकलगर्दी आणि जीवघेणा प्रवास! रेल्वे प्रवाशांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमधून...
Explainer : लोकल प्रवाशांची सहनशीलता संपलीय का? तुम्हाला काय वाटतं?

अपघात रोखण्यासाठी रेल्वेने कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत?

उपाययोजनांमध्ये दोन गोष्टी आहेत. एक लघुकालीन आणि दुसरी दीर्घकालीन अशा दोन उपाययोजना आहेत. दीर्घकालीन उपाययोजनेत पर्यायी मार्गिका तयार करणे ही योजना आहे. तर लघुकालीन उपाययोजनेत शहरातील आस्थापने, संस्था आहे, त्यांना कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्याविषयी सूचना करणे. कार्यालयात कर्मचाऱ्यांना एकाच वेळी न बोलवता, वेगवेगळ्या वेळेत बोलविण्याविषयी सूचना करणे. या उपाययोजना आखल्या आहेत.

सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरून सर्वत्र पोहोचण्याचा मार्ग

प्रत्येक लोकल ट्रेन ही सीएसएमटी रेल्वे स्टेशनमधून जाते. अडीच ते पावणे तीन मिनिटांत एक रेल्वे निघत असते. आता या पेक्षा कमी वेळात गाडी काढणे आता शक्य नाही. मध्य रेल्वेच्या सीएसएमटीमधून दोन दिशेकडे लोकल सेवा सुरु आहेत. एक कुर्ल्यापर्यंत जाते. त्यानंतर प्रवासी लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाऊ शकतात. त्यानंतर पुढे ठाणे स्टेशनपर्यंत लोकल जाते. ठाण्यात पोहोचल्यानंतर तेथून दुसरा मार्ग फुटतो. पुढे ट्रान्सहार्बर मार्ग आहे. तसेच पुढे कल्याणला गेल्यानंतर दिव्यावरून वसईरोडच्या दिशेने गाड्या जातात. कळंबोळीच्या मार्गावर गाड्या जातात. तर कर्जत-कसारा या दोन दिशेनेही गाड्या जातात.

Mumbai Local Train News: लोकलगर्दी आणि जीवघेणा प्रवास! रेल्वे प्रवाशांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमधून...
Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

पीक अवर्समध्ये गाड्या कमी सोडल्या जातात का?

मुंबईत पीक अवर्समध्ये लोकल सेवा उपलब्ध आहेत. या वेळेत दर दोन मिनिटाला लोकल सेवा आहे. लोकल सेवेसोबत प्रवाशांच्या सुरक्षेचाही विचार करावा लागतो. रेल्वे प्रवाशांना सुरक्षा प्रदान करणे ही आमची प्राथमिकता आहे.

लोकलमधील वाढत्या गर्दीविषयी रेल्वेचं म्हणणं काय?

रेल्वेकडून स्वस्त दरात सेवा पुरवली जाते. त्यामुळे अनेक जण रेल्वे सेवेवर विसंबून आहेत. कल्याण ते सीएसएमटीदरम्यान येणे-जाण्याला जितके टॅक्सीचे भाडे लागते. तितक्या खर्चात रेल्वेचा एक महिन्याचा पास उपलब्ध होतो. रेल्वे अत्यंत किफायतशीर पैशांमध्ये रेल्वे प्रवास उपलब्ध करून देते. यामुळे प्रवासासाठी रेल्वेवर विसंबून राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे लोकलमध्ये गर्दी दिसते.

Mumbai Local Train News: लोकलगर्दी आणि जीवघेणा प्रवास! रेल्वे प्रवाशांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या मुलाखतीमधून...
Mumbai Local : अवकाळी पावसाने मुंबईची लोकलसेवा कोडमडली; अनेक स्थानकांवर गर्दीचा महापूर, पाहा Video

छोटासाही बिघाड झाला तर मोठा परिणाम जाणवतो

एखाद्यावेळी काही बिघाड झाला, तर तो दुरुस्त करण्यासाठी वेळ लागतो. इतर व्यवस्थेत दुरुस्तीसाठी वेळ असतो. मात्र, या व्यवस्थेत तसा वेळच नाही. लोकल ट्रेन दर तीन मिनिटाने निघत असतात. पाच मिनिटांचाही बिघाड झाला, तरी त्याचा परिणाम १०० गाड्यांवर होतो. दोन गाड्यांमध्ये जास्त वेळ नाही. रेल्वेकडून जास्तीत जास्त गाड्या चालवल्या जातात. छोटासाही काही बिघाड झाला, तर त्याचा परिणाम मोठा होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com