Explainer : लोकल गर्दीमुळे आणखी किती रियांचे बळी जाणार? डोंबिवली - कोपरदरम्यानच घटना का घडताहेत?

local train rush explainer : डोंबिवली ते कोपरदरम्यान लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू लागल्याने मध्य रेल्वेवरील प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
dombivli woman dies
dombivli woman diesSaam tv

मुंबई : दोन दिवसांपूर्वी डोंबिवली ते कोपरदरम्यान २६ वर्षीय रिया राजगोर या तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. मागील चार दिवसातील ही दुसरी घटना आहे. या घटनेनंतर लोकल ट्रेनमधील गर्दीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्याचबरोबर डोंबिवली ते कोपरदरम्यान लोकलमधून पडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू लागल्याने मध्य रेल्वेवरील प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

रियाचा मृत्यू कसा झाला?

'हिंदुस्तान टाइम्स'च्या वृत्तानुसार, रियाने कामाला जाण्यासाठी सकाळी ८ वाजताच्या सुमारास प्रवाशांनी खचाखच भरलेली ट्रेन पकडली. डोंबवलीनंतर ट्रेन वेगात धावू लागली. त्याचदरम्यान रियाचा तोल गेला, त्यानंतर ती ट्रेनमधून पडली. या घटनेत रियाचा जागीच मृत्यू झाला.

रियासोबत नेमकं काय घडलं?

'लोकल ट्रेनमध्ये आधीपासून भरपूर गर्दी असते. त्यामुळे दररोज या लोकल ट्रेनने प्रवास करणे त्रासदायक असते, अशी प्रतिक्रिया रियाची ट्रेनमधील मैत्रीण लीना कुशवाहने दिली. 'त्या दिवशी रिया ट्रेनच्या दरावाज्यामध्ये उभी होती. गर्दीमुळे तिला आतमध्ये यायला मिळालं नाही. त्यामुळे ती ट्रेनच्या दरवाज्यामध्ये उभी राहिली. लोकलने वेग पकडल्यानंतर डब्बा दोन्ही बाजूने कलंडतो. अशा वेळी लोकलमध्ये गर्दी असेल, तर त्यावेळी भार हा दारात उभे असणाऱ्या प्रवाशांवर येतो. डोंबिवलीनंतर प्रवाशांचा भार आल्याने रियाचा तोल गेला आणि ती ट्रेनमधून पडली, असेही तिने सांगितले'.

मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते ठाणे रेल्वे स्टेशनदरम्यान मागील चार दिवसांत लोकलमधून पडून दोन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. २५ एप्रिलला अवधेश राजेश दुबे या तरुणाचा दिवा ते ठाणेदरम्यान लोकलमधून पडून मृत्यू झाला. तर रिया ही लोकल गर्दीची दहावी बळी ठरली. मागील दोन महिन्यात डोंबिवली ते ठाणे दरम्यान आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

dombivli woman dies
Dombivali News: धावत्या लोकलमधून पडून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबाचा आधार हिरावला

'डोबिवली ते मुंबईदरम्यान दररोज ३७ लाख रेल्वेप्रवासी प्रवास करतात. मात्र, या प्रवाशांसाठी डोंबिवलीतून फक्त १७ ट्रेन सोडल्या जातात. डोंबिवलीतून अधिकच्या ट्रेन सोडल्या तर अपघाती मृत्यू टाळता येऊ शकतात, अशी माहिती जीआरपी अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

रेल्वे अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

'कल्याण रेल्वे यार्डाचा रिमॉडेलिंग प्रकल्प पूर्ण होत नाही, तोपर्यंत ट्रेनची संख्या वाढवणे अवघड आहे. आम्ही मध्य रेल्वेच्या सर्व सहा लाईन्सचा वापर करतो. आम्ही जितक्या शक्य आहे, तितक्या ट्रेन चालवत आहोत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या प्रवक्त्यांनी दिली.

dombivli woman dies
Dombivli Local Train Accident : डोंबिवलीतील तरुणीचा लोकलमधून पडून दुर्दैवी मृत्यू

गर्दी कमी करण्याबाबत रेल्वे विभागाचा विचार काय?

मुंबईतील लोकल ट्रेनमधील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने ५०० खासगी संस्था आणि सरकारी विभागाच्या कार्यालयांना पत्र लिहून कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल करण्याचा सल्ला दिला होता. रेल्वेच्या विनंतीनंतर डाक विभागाने त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेळेत बदल केला होता. तसेच कंपनीला दोन शिफ्टमध्ये काम करण्याचा सल्ला दिला होता.

dombivli woman dies
Woman falls Off train near Dombivli : लोकलगर्दीचा बळी! डोंबिवलीजवळ धावत्या ट्रेनमधून पडून २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू

रेल्वे प्रवासी सूरज आहिरे काय म्हणाले?

'मुंबईत एसी लोकल सुरू करण्यात आल्या आहेत. या एसी लोकलच्या फेऱ्यांचं नियोजन रेल्वे प्रशासनाला योग्यरित्या जमलं नसल्याचे दिसून येत आहे. एसी लोकलचे तिकीटदर सर्वसामान्य लोकांना परवडत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी साध्या लोकल ट्रेनने प्रवास करतात. त्यामुळे ट्रेनमध्ये गर्दी वाढत आहे. यामुळे प्रवाशांना लोकल ट्रेनमध्ये गर्दीचा सामना करावा लागतो. तसेच डोंबिवली ते कोपरदरम्यान चाळीतील घरे आणि इमारतीमधील घरांची उपलब्धी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे या भागात रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढत आहे, असे दिसून येत आहे, असं मत मध्य रेल्वेने नियमित प्रवास करणारे सूरज आहिरे यांनी व्यक्त केलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com