Dombivali News: धावत्या लोकलमधून पडून पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू; कर्ता व्यक्ती गेल्याने कुटुंबाचा आधार हिरावला

Mumbai Local Train News: प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून पडून एका २५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना कोपर रेल्वे स्थानकाजवळ घडली.
Mumbai Local Train News
Mumbai Local Train NewsSaam TV
Published On

अभिजित देशमुख, साम टीव्ही कल्याण

Dombivali Local Train News

प्रवाशांनी खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनमधून पडून एका २५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना कोपर रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (ता. २७) सकाळच्या सुमारास घडली. रोहित रमेश किळजे (वय २५) असं मृत पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Local Train News
Fishermen Arrest On Murud Beach : मुरुड किनारपट्टीवर ३७ मच्छिमारांना अटक; मोठं कारण आलं समोर

मिळालेल्या माहितीनुसार, मृत रोहित किळजे डोंबिवली पश्चिमेकडील मथुरा अपार्टमेंट परिसरात आपल्या कुटुंबियासोबत राहत होते. मुंबईतील ताडदेव येथील पोलीस मुख्यालयात त्याची ड्युटी होती. वडिलांच्या अकस्मात मृत्यूनंतर रोहित २०१८ मध्ये पोलीस खात्यात त्यांच्या जागी नोकरीला लागले होते.  (Latest Marathi News)

ताडदेव येथे मुख्यालयात ड्युटी असल्याने रोहित दररोज डोंबिवली ते दादर असा लोकल ट्रेनने प्रवास करीत असत. बुधवारी रोहित नियमितपणे सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांनी ड्युटीला जाण्यासाठी निघाले. त्यांनी डोंबिवली येथून दादरकडे निघालेली जलद लोकल ट्रेन पकडली.

ट्रेनमध्ये प्रवाशांची गर्दी असल्याने रोहित दरवाजाजवळ उभे राहून प्रवास करीत होते. कोपर रेल्वेस्थानकाजवळ ट्रेन आली असता, रोहित यांचा अचानक हात सुटला आणि ते धावत्या लोकलमधून खाली पडले. दरम्यान, प्रवाशांनी या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या रोहित यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. वडिलानंतर रोहित घरातील कर्ता व्यक्ती होते. त्यांच्या निधनाने आई आणि बहिणीचा आधार हिरावला गेला आहे. त्याचा मृतदेह चिपळूण येथील राहत्या घरी अंतिम विधीसाठी नेण्यात आला आहे.

Mumbai Local Train News
KDMC Action Property Holders : KDMC ची 26 बड्या मालमत्ताधारकांवर जप्तीची कारवाई; काय आहे कारण? जाणून घ्या

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com