एलईडीच्या मदतीने रात्रीच्या प्रतिबंधित मासेमारी केल्याप्रकरणी तटरक्षक दलाने कारवाई केली आहे. चार मच्छिमार नौकांसह ३७ मच्छिमारांना अटक केली असून आगरदांडा पोलिसांच्या हवाली केलं आहे. उच्च शक्तीचे ४२ हॅलोजन, २२ अंडरवॉटर एलईडी डिझेल जनरेटर तसेच प्रतिबंधित मासेमारी गिअर असे एकूण ३० लाखांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
सर्व बेकायदेशीर मासेमारी प्रकरणी २० 20 मार्च 24 रोजीही कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत 103 कर्मचाऱ्यांसह 10 बोटी पकडून मुरुड मासेमारी विभाग आणि सागरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं होत. ही घटना ताजी असतानात काही मच्छिमार बेकायदेशीर मासेवारी करताना आढळले आहेत.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
एलईडी मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. या पद्धतीच्या मासेमारीमुळे समुद्रातील माशांच्या प्रजाती मोठ्या प्रमाणात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. एलईडी मासेमारीला शासनाची बंदी असताना देखील शासन आदेश झुगारून हे मच्छीमार राजरोसपणे मोठ्या प्रमाणात एलईडी मासेमारी करत असतात.
एल.इ.डी मासेमारी करणाऱ्यांवर बंदी असली तरी खोल समुद्रात मोठ्या प्रमाणत एल.इ.डी मासेमारी सुरु आहे. त्यामुळे छोटे छोटे मच्छिमार, पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे दालदी मच्छिमार हैराण झाले असून, खोल समुद्रात जाऊनसुद्धा त्यांना आपल्या मेहनतीप्रमाणे पुरेशी मासळी मिळत नसल्याने कर्जबाजारी झाले आहेत, असा दावा मच्छिमारांकडून करण्यात येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.