Lok Sabha Election 2024: मतदारांना प्रलोभन देणाऱ्या आणि घेणाऱ्यांवर होणार कारवाई, या टोल फ्री क्रमांक करता येईल तक्रार
>> संजय गडदे
Maharashtra Lok Sabha Election 2024:
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ च्या अनुषंगाने आचार संहितेअंतर्गत मतदारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. कोणतेही पारितोषिक, रोख रक्कम देणाऱ्या किंवा स्वीकारणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती मुंबई उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे.
प्रलोभन अथवा धमकी संदर्भात मतदारांना तक्रार करावयाची असल्यास, तक्रार सनियंत्रण कक्षातील १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. या क्रमांकावर २४ तास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व मतदारांनी कायदेशीर तरतुदींचे पालन करणे गरजेचे आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम १७१ ‘ख’ नुसार, निवडणूक प्रक्रियेच्या काळात मतदानाचा हक्क वापरण्याकरिता व्यक्तीला प्रलोभन दाखवण्याच्या कोणतेही पारितोषिक, रोख रक्कम देणारी किंवा स्वीकारणारी व्यक्ती एक वर्षापर्यंतच्या कारावासास किंवा दंडास किंवा दोन्ही शिक्षेस पात्र असेल. (Latest Marathi News)
तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम १७१ ‘ग’ नुसार, कोणतीही व्यक्ती उमेदवाराला किंवा मतदाराला किंवा कोणत्याही इतर व्यक्तीला धमकावेल किंवा कोणत्याही स्वरुपाची इजा पोहोचवेल, अशा व्यक्तीला एक वर्षापर्यंत कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.
लाच घेणारा व देणारा या दोहोंच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी आणि मतदारांना धमकी देणाऱ्या व धाकटदपटशा करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी भरारी पथके गठित करण्यात आली आहेत. सर्व मतदारांनी कोणत्याही प्रकारची लाच स्वीकारू नये किंवा धमकीस बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी क्षीरसागर यांनी केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.