बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी तुमच्यासमोर आलाे, रणजितसिंहना बदला; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांना ठणाकावून सांगितलं

Lok Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माढा आणि सातारामधीर कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या. या बैठकीस आमदार रामराजे निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील उपस्थितीत हाेते.
ajit pawar held meeting of ncp karyakarta for satara and madha lok sabha election 2024
ajit pawar held meeting of ncp karyakarta for satara and madha lok sabha election 2024saam tv

- सचिन जाधव

Ajit Pawar Latest Marathi News :

माढा लाेकसभा मतदारसंघात (madha lok sabha constituency) महायुतीने (mahayuti) उमेदवार बदलावा अशी मागणी आज (बुधवार) राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांच्याकडे केली. कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत माढा मतदारसंघात आमची प्रचार करण्याची मानसिकता नसल्याचे पवार यांना स्पष्ट केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकरांना (ranjitsinh naik nimbalkar) यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका ही कार्यकर्त्यांची त्यांचा प्रचार करण्याची इच्छा नाही असे चित्र आज अजित पवार यांच्या बैठकीत दिसून आले.

ajit pawar held meeting of ncp karyakarta for satara and madha lok sabha election 2024
Paduka Darshan Sohala : आम्ही भक्तीच्या गंगेत न्हालो

या बैठकीत आम्ही बरं बोलण्यापेक्षा खरं बोलण्यासाठी, अजित दादा तुमच्यासमोर आलाे आहे असे कार्यकर्त्यांनी नमूद केले. भाजपचा आणि उमेदवाराचा सगळा एक कलमी कार्यक्रम आहे. त्यामुळं तुम्ही भाजपचा उमेदवार बद्दलण्याबाबत विचार करावा. भाजपच्या वरिष्ठांना हे कळवावे. निंबाळकर सोडून कोणताही उमेदवार द्या, आम्ही जोमाने काम करू आणि त्यांना खासदार बनवू असेही कार्यकर्त्यांनी ठणकावून अजित पवार यांना सांगितले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सातारा लोकसभा मतदारसंघात नितीन पाटील हवेत

साताऱ्यात सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना सातारा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली. या बैठकीस आमदार रामराजे निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, आमदार मकरंद पाटील उपस्थितीत हाेते.

Edited By : Siddharth Latkar

ajit pawar held meeting of ncp karyakarta for satara and madha lok sabha election 2024
Udayanraje Bhosale : दाेन्ही नेत्यांच्या वक्तव्याने सातारा लाेकसभा मतदारसंघ बुचकळ्यात, साता-यात उद्या भूमिका स्पष्ट करेन : उदयनराजे भाेसले

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com