Udayanraje Bhosale : दाेन्ही नेत्यांच्या वक्तव्याने सातारा लाेकसभा मतदारसंघ बुचकळ्यात, साता-यात उद्या भूमिका स्पष्ट करेन : उदयनराजे भाेसले

Satara Lok Sabha Election 2024 : खासदार उदयनराजे भाेसले हे काेणत्या चिन्हावर निवडणुक लढविणार हे अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी त्यांच्या समर्थकांनी कमळ चिन्हासह त्यांचे फलक तयार केलेत.
udayanraje bhosale statement on satara lok sabha constituency election
udayanraje bhosale statement on satara lok sabha constituency electionsaam tv

- रणजीत माजगावकर / नितीन पाटणकर

Satara Lok Sabha Constituency :

सातारा लाेकसभा मतदारसंघाच्या (satara lok sabha constituency) उमेदवारीबाबत भाजप नेते राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale latest marathi news) यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांना निश्चित सिग्नल दिला असेल असे मत खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केले. दरम्यान आज (बुधवार) खासदार उदयनराजे भाेसले यांनी पुण्याहून साता-याला जाताना उद्या (गुरुवार) आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

खासदार उदयनराजे भाेसले यांना भारतीय जनता पक्षातून उमेदवारी मिळाल्याचे संकेत मिळत आहे. केवळ अधिकृत घाेषणा हाेणे बाकी आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातत्याने सातारा लाेकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काॅंग्रेसचा दावा करीत आहेत. मंगळवारी (ता. 26) देखील पवार यांनी भाजपचे नेते उदयनराजे भाेसले यांना समजावून सांगतील असे सूचक विधान केले.

खासदार उदयनराजे भाेसले हे काेणत्या चिन्हावर निवडणुक लढविणार हे अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाले नसले तरी त्यांच्या समर्थकांनी कमळ चिन्हासह त्यांचे फलक तयार करुन राजेंच्या आज साता-यात स्वागताची तयारी केली आहे.

udayanraje bhosale statement on satara lok sabha constituency election
Chandrahar Patil : सांगली लाेकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर हाेताच नाराज काॅंग्रेसवर चंद्रहार पाटील स्पष्टच बाेलले

उदयनराजेंना बिनविरोध निवडून द्यावं : बुधाजीराव मुळीक

काही वेळापूर्वी उदयनराजे भाेसले यांनी साता-याकडे प्रस्थान केले. यावेळी उदयनराजेंना बिनविरोध निवडून द्यावं अशी मागणी जेष्ठ कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक यांनी केली आहे. मुळीक यांनी पुण्यात उदयनराजे यांचे स्वागत केले. त्यानंतर मुळीक यांनी सातारच्या चिंतन आणि सर्व राजकीय पंचांना उदयनराजेंना बिनविरोध निवडून देण्याचे आवाहन केले.

त्यापूर्वी उदयनराजे भाेसले यांनी माध्यमांच्या एका प्रश्नावर सकारात्मक माहित मग काय मी नकारात्मक राहू का असे म्हटले. तसेच साता-यात आपली भूमिका स्पष्ट करु अशी टिप्पणी केली.

udayanraje bhosale statement on satara lok sabha constituency election
Paduka Darshan Sohala : पादुका दर्शनाला दिसला भाविकांचा अलोट उत्साह; आज भक्तिसोहळ्याचा शेवटचा दिवस

उदयनराजेंना ग्रीन सिग्नल : खासदार धनंजय महाडिक

खासदार धनंजय महाडिक म्हणाले उदयनराजेंच्या उमेदवारी बाबत वरिष्ठांचा निर्णय असणार आहे. मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. महाराज सुद्धा आज मोठी रॅली काढत आहेत, कदाचित त्यांना उमेदवारीची संकेत मिळाले असतील असेही महाडिक यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

udayanraje bhosale statement on satara lok sabha constituency election
Paduka Darshan Sohala 2024: हरी का ध्यान लगा मन मेरे... ; गायक हरिहरन यांच्या भक्तिभावात भाविक तल्लीन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com