मुखी हरी नाम जप करत हजारो भाविकांनी नवी मुंबईच्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सुरु असलेल्या पादुका दर्शन सोहळ्याला हजेरी लावली. या सोहळ्यात अनेकांनी तहान भूक विसरून श्रीगुरुंच्या पादुकांवर मस्तक कृतकृत्य झाल्याची भावना व्यक्त केली. तसेच या सोहळ्याचा आज बुधवारी समारोप होणार आहे. (latest Marathi News)
नवी मुंबईतील वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सद्गुरू पादुका मंदिर परिसरात 'श्रीगुरू पादुका उत्सव' सोहळा सुरु आहे. 'सकाळ माध्यम समूहा'तर्फे 'श्री फॅमिली गाईड' प्रोग्रॅमअंतर्गत या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यामध्ये १८ संत- महात्म्यांच्या पादुका दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.
'सकाळ'तर्फे कालपासून आयोजित केलेल्या या 'संकल्प ते सिद्धी सोहळा' या उत्सवात मंगळवारी राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेले गुरुसेवक भक्तीच्या रंगात दंग झालेले पाहायला मिळाले. त्याचबरोबर मंगळवारी सकाळपासून संत-महात्म्यांच्या पादुकांचे एकत्रितपणे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली.
या सोहळ्यात विठ्ठलाच्या रूपातील बाल वारकऱ्यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या वेळी या बाल वारकऱ्यांनी विठोबा-रखूमाईचा जयघोष करत ठेका धरला. त्यांच्या फुगड्या, कसरती पाहून त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.
दरम्यान, या सोहळ्यात बुधवारी आध्यात्मिक गुरू श्री एम मार्गदर्शन करणार आहेत. तसेच डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांच्या मार्गदर्शनाखाली एकाच वेळी अग्निहोत्रही होणार आहे.
या सोहळ्यासाठी नागरिकांना पादुका दर्शन सोहळ्यासाठी विनामूल्य प्रवेश असणार आहे. मात्र या सोहळ्यात प्रवेश मिळावा, यासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करावी लागणार आहे. सोहळ्याला प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल. सविस्तर माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या. www.srifamilyguide.com अधिक माहितीसाठी ८८८८८३९०८२ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.