Manasvi Choudhary
आध्यात्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभव ही भारताची ओळख आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘श्री फॅमिली गाइड’ प्रोग्रामच्या माध्यमातून आज आणि उद्या नवी मुंबई वाशी येथे ‘श्रीगुरू पादुका दर्शन उत्सव’आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात १८ संत आणि सद्गुरूंच्या पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी होणार आहे.
वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हा दोन दिवसीय भव्य सोहळा पार पडणार आहे.
भव्यदिव्य ‘श्रीगुरू पादुका सोहळ्यात' महाराष्ट्रातील १८ संत-महात्म्यांच्या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे.
श्रीगुरू पादुकादर्शन उत्सवासाठी एका रांगेत तीन याप्रमाणे सहा विभाग करण्यात आले आहे.
श्रीगुरू पादुकादर्शन उत्सव’ या उपक्रमांतर्गत सामाजिक, आध्यात्मिक, शारीरिक आणि आर्थिक प्रगती साधण्यासाठी ‘संकल्प ते सिद्धी सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे.
श्रीगुरू पादुकादर्शन उत्सव’ भाविकांसाठी विनामूल्य आहे. त्यासाठी क्यूआर कोडद्वारे नोंदणी करावी लागणार आहे