काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

7 Year Old Girl Killed In Road Accident Washim Maharashtra: वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील कवठळ येथे भरधाव कारच्या धडकेत ७ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू. सीसीटीव्हीत घटना कैद; परिसरात हळहळ व्यक्त.
A CCTV grab showing the tragic moment a speeding car hit a 7-year-old girl crossing the road in Washim district.
A CCTV grab showing the tragic moment a speeding car hit a 7-year-old girl crossing the road in Washim district.saam tv
Published On

मनोज जयस्वाल, साम टीव्ही

वाशिम जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील कवठळ येथे रस्ता ओलांडत असलेल्या एका ७ वर्षीय चिमुरडीला भरधाव कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चिमुरडीचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील एका सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून, हा थरार पाहून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

A CCTV grab showing the tragic moment a speeding car hit a 7-year-old girl crossing the road in Washim district.
Rain Alert: मुंबईसह ठाणे-रायगडमध्ये पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस; पालघर- ठाण्यात उद्या शाळांना सुट्टी

मिळालेल्या माहितीनुसार, सदर ७ वर्षांची चिमुरडी आपल्या आजोबांसोबत कवठळ येथील आठवडी बाजारात गेली होती. बाजार आटोपून आजोबांसोबत घरी परतत असताना, रस्ता ओलांडत असताना मागून आलेल्या एका भरधाव कारने तिला जोरदार धडक दिली. कारचा वेग इतका जास्त होता की चिमुरडी या धडकेत गंभीर जखमी झाली.

A CCTV grab showing the tragic moment a speeding car hit a 7-year-old girl crossing the road in Washim district.
Maharashtra Politics: उल्हासनगरमध्ये शिंदेसेनेला दुसरा मोठा धक्का, आणखी एका नगरसेविकेचे पद गेलं

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि नातेवाईकांनी तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयाकडे रवाना केले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत तिची प्राणज्योत मालवली. आजोबांसोबत बाजारात गेलेल्या चिमुरडीवर अचानक काळाने घाला घातल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे कवठळ परिसरासह संपूर्ण वाशिम जिल्ह्यात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com