माजलगाव तहसील कार्यालयासमोर भीषण अपघात; कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Majalgaon Road Mishap: बीड जिल्ह्यातील माजलगाव तहसील कार्यालयाजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. यात दुचाकी आणि कारचा चुराडा झालाय.
beed accident
Majalgaon Road Mishap:
Published On
Summary
  • कार आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.

  • ही दुर्घटना बायपास रोडवरील तहसील कार्यालयासमोर सायंकाळी घडली.

  • अपघातात आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

बीडमधील माजलगाव शहरातील कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. शहरातील बायपास रोडवरील तहसील कार्यालयासमोर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. एमएच 12 एचएफ 3623 क्रमांकाची कार आणि एमएच 44 एएफ 2395 क्रमांकाची दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

beed accident
Sangli Accident: प्रवाशांनी खचाखच भरलेली रस्त्याच्या कडेला उलटली, चालकासह दोघांचा जागीच मृत्यू

मृत मुलाचे नाव करीम खदीर शेख (वय 14 रा. इंदिरानगर, माजलगांव असे आहे. करीम हा आपल्या चुलत भावासह मोटारसायकल वरून बायपास रोडने संभाजी चौकाकडे जात होता. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

beed accident
पंढरपुरात अपघाताचा थरार; १४ भाविकांवर काळाचा घाला, भीषण दुर्घटनेने महाराष्ट्रावर शोककळा

धडक इतकी भीषण होती की, इर्टीका कारचा समोरील भाग पूर्णपणे दबला, तर मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेल्या करीम खदीर शेख याचा जागीच मृत्यू झाला.

प्रवाशांनी खचाखच भरलेली रस्त्याच्या कडेला उलटली

सांगलीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली. प्रवाशांनी खाचखच भरलेल्या खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला. भरधाव बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बस चालकाचा समावेश आहे. अपघाताची ही घटना पलूसच्या घोगाव येथे घडली. या अपघातामध्ये बसमधील १५ प्रवासी जखमी झाले. सांगलीच्या पलूस तालुक्यातील घोगाव येथे खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com