पंढरपुरात अपघाताचा थरार; १४ भाविकांवर काळाचा घाला, भीषण दुर्घटनेने महाराष्ट्रावर शोककळा

Pandharpur Pickup Accident Well Tragedy Details: पंढरपूरजवळ भीषण अपघातात 14 भाविकांचा मृत्यू झाला. विहिरीला संरक्षण भिंत नसल्याने पिकअप गाडी थेट विहिरीत कोसळली.
Rescue teams at the accident site near Pandharpur where a pickup vehicle fell into an unprotected well, killing 14 devotees.
Rescue teams at the accident site near Pandharpur where a pickup vehicle fell into an unprotected well, killing 14 devotees.saam tv
Published On

भरत नागणे, साम टीव्ही

पंढरपुरमध्ये घडलेल्या घटनेने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. एका विहिरीत पिकअप पडल्याने 14 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पंढरपुर तालुक्यातील म्हसवड पंढरपूर महामार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात झाला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू जल असून सर्वजण पंढरपूर तालुकत्यातील रांजणी गावचे असल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, हे सगळे भाविक पंढरपूर तालुक्यातील रांजने गावचे असून हे सर्वजण एका खासगी गाडीतून म्हसवड येथे दर्शनाला गेले होते. देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात घडलेला आहे. खरेतर या घटनेने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, वैद्यकीय अधिकारी बचावकार्य पथक त्या ठिकाणी पोहोचले असून वाहन बाहेर काढायचे काम सुरू आहे.

Rescue teams at the accident site near Pandharpur where a pickup vehicle fell into an unprotected well, killing 14 devotees.
Solapur Accident: नाशिकच्या अपघाताची पुनरावृत्ती! माळशिरसमधील थरकाप उडवणारा अपघात घडला कसा?

विहिराला कुठलीही संरक्षण भिंत नाही

हा अपघात ज्या ठिकाणी झाला. ती विहिरी रस्त्याच्या अगदी 20 ते 25 फुटावरती आहे. या विहिरीला कुठलीही संरक्षण भिंत नसल्याने गाडी थेट विहिरीत गेली. ही विहीर रस्त्याच्या बाजूलाच असल्याने आणि कुठलेही संरक्षण कथडा नसल्याने हा अपघात झाल्याचे उपस्थितांनी सांगितले. ही विहीर पाण्याने तुडुंब भरलेली होती.

Rescue teams at the accident site near Pandharpur where a pickup vehicle fell into an unprotected well, killing 14 devotees.
Accident: विठुरायाच्या दर्शनापूर्वीच काळाचा घाला, भरधाव कारला अपघात; २ भाविकांचा जागीच मृत्यू

मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश

या अपघाताची माहिती मिळताचा संपूर्ण प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या घटनेतील मृतांमध्ये 4 लहान मुलांचा समावेश आहे. तसेच या घटनेत सध्यातरी 2 जण बचावले असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर लोकांना गर्दी केली असून मृतदेह बघून उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. दरम्यान या घटनेवर बोलताना सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या अपघाताची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com