तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई! FDA मधील सहाय्यक आयुक्ताला केलं निलंबित; प्रशासनात खळबळ

Tukaram Mundhe suspends FDA officer in Wardha: वर्ध्यातील प्रसिद्ध गोरस भंडार प्रकरणात FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची मोठी कारवाई. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल टोपले यांना निलंबित करण्यात आलं आहे.
TukaramMundhe
TukaramMundhesaam tv
Published On: 

वर्धा: महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी स्थापन केलेल्या वर्ध्यातील प्रसिद्ध 'गोरस भंडार' प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) गोरस भंडारवर केलेली कारवाई बेकायदेशीर ठरवल्यानंतर आता FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी संबंधित अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत वर्ध्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न) आणि नियुक्त अधिकारी प्रफुल्ल बी. टोपले यांना 27 नोव्हेंबरला निलंबित करण्यात आलं आहे.

TukaramMundhe
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक कारखान्यांकडून 2600 कोटींची काटामारी?

इंडियन एक्सस्प्रेसच्या हवालानुसार, गोरस भंडारमधील अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनासंदर्भात डिसेंबर 2023 आणि जून 2025 मध्ये दोन तपासणी अहवाल तयार करण्यात आले होते. मात्र, या अहवालांवर टोपले यांनी कोणतीही कारवाई केली नाही, असा ठपका निलंबन आदेशात ठेवण्यात आला आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान ही बाब समोर आल्यानंतर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

TukaramMundhe
Delimitation Bill:स्टॅलिन यांची मनधरणी करण्यासाठी राहुल-सोनिया गांधी मैदानात! 20 दिग्गज नेत्यांची फौज चेन्नईत दाखल, यादी आली समोर

गोरस भंडार हा केवळ एक दुग्धव्यवसाय नसून त्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. 1931 मध्ये महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांनी गोसंवर्धन आणि ग्रामीण स्वावलंबनाच्या उद्देशाने या संस्थेची स्थापना केली होती. आज या सहकारी संस्थेमार्फत 15 गावांमधील जवळपास 800 कुटुंबांकडून दररोज सुमारे 9 हजार लिटर दूध संकलित केलं जातं. या दुधापासून पेढा, बासुंदी, श्रीखंड, तूप आणि प्रसिद्ध गोरस पाक यांसारखे पदार्थ तयार केले जातात.

TukaramMundhe
Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

दरम्यान, 31 मे 2025 रोजी FDA च्या पथकाने गोरस भंडारवर अचानक तपासणी केली होती. या तपासणीनंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 जून रोजी वर्ध्याच्या सहाय्यक आयुक्तांनी संस्थेचा परवाना निलंबित केला. त्यामुळे संस्थेचं उत्पादन बंद झालं होतं. FDA च्या या कारवाईविरोधात गोरस भंडारने न्यायालयात धाव घेतली.

7 जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती अनिल एस. किलोर आणि न्यायमूर्ती राज वाकोडे यांच्या खंडपीठाने FDA ची कारवाई रद्द केली. अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 मधील तरतुदींनुसार आवश्यक प्रक्रिया न पाळता ही कारवाई करण्यात आल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं. तसेच, FDA ने ज्या सुधारणा नोटिशीचा आधार घेतला होता, ती नोटीस संस्थेला बजावण्यातच आली नव्हती, असंही न्यायालयाने नमूद केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.