ऊस उत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक कारखान्यांकडून 2600 कोटींची काटामारी?

₹2,600 Crore Sugarcane Weighing Scam: राज्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर साखर कारखान्यांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. साखर कारखान्यांकडून सुरू असलेल्या लूटमारीचा अॅग्रोवननं पर्दाफाश केलाय. शेतकऱ्यांची कशी लूटमार सुरू आहे?... पाहूयात या रिपोर्टमधून...
SUGAR MILL SCAM
SUGAR MILL SCAMsaam tv
Published On: 

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून रास्त भाव मिळण्यासाठी आक्रमक झालेला असताना साखर कारखान्यांच्या लुटमारीचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. साखर कारखान्यांकडून उसाच्या वजनात काटामारी होत असल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आलाय. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर डल्ला मारणाऱ्या साखर कारखान्यांच्या लुटमारीचा कृषी दैनिक अॅग्रोवननं पर्दाफाश केलाय. कारखान्यांकडून काटामारीतून नेमकी कशी लूट केली जातेय ते पाहूयात....

एव्हंढच नव्हे तर एफआरपीच्या दरवाढपेक्षा लूट कशी जास्त आहे तेही पाहूयात तर कारखान्यांच्या लुटीविरोधात शेतकरी संघटना आक्रमक झाली असून शेतकरी नेते राजू शेट्टींनी सरकारवर आरोप केलाय.. आधीच दुष्काळ, वाढलेला उत्पादन खर्च आणि गाळप हंगामात मिळालेला तुटपुंजा भाव यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत अडकलाय. त्यातच कारखानदारांच्या या छुप्या लूटमारीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला जात असल्यानं संताप व्यक्त होतोय. त्यामुळे कारखान्यांच्या लुटीविरोधात साखर आयुक्तालय कारवाई करणार का?... की कारखान्यांकडून शेतकऱ्यांची अशीच लूटमार सुरूच राहणार, हाच खरा प्रश्न आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.