Delimitation Bill:स्टॅलिन यांची मनधरणी करण्यासाठी राहुल-सोनिया गांधी मैदानात! 20 दिग्गज नेत्यांची फौज चेन्नईत दाखल, यादी आली समोर

Rahul Gandhi Sonia Gandhi Chennai Visit For MK Stalin Meeting: डिलिमिटेशन विधेयकाला विरोध करण्यासाठी इंडिया आघाडी सक्रिय झाली आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह 20 नेत्यांचे शिष्टमंडळ चेन्नईला रवाना झाले आहे.
Delimitation Bill
Delimitation Billsaam tv
Published On: 

संसदेत डिलिमीटेशन विधेयक हाणून पाडण्यासाठी आता इंडिया आघाडी पूर्ण ताकदीने सक्रिय झाली आहे. काँग्रेसचे बडे नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खरगे मैदानात उतरले आहेत. हे सगळे नेते आणि एम के. स्टॅलिन आणि शरद पवार यांची भेट घेऊन या विधेयकाला पाठिंबा न देण्यासाठी विनंती करणार आहे.

Delimitation Bill
महामार्गावर भीषण अपघात! काँग्रेस नेता अन् बजरंग दलाच्या अध्यक्षाचा जागीच मृत्यू

इंडिया आघाडीचं एक शिष्टमंडळ चेन्नईला रवाना झालं आहे. या शिष्टमंडळात काँग्रेससह इंडिया आघाडीतील विविध घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांचा समावेश आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. दरम्यान या चेन्नईला गेलेल्या नेत्यांची यादी समोर आली आहे.

Delimitation Bill
Breaking News : राजकारणात खळबळ! बड्या नेत्याने सोडली आम आदमी पक्षाची साथ

चेन्नईला गेलेल्या शिष्टमंडळातील सदस्यांची यादी :

1. राहुल गांधी

2. के. सी. वेणुगोपाल

3. डी. के. शिवकुमार

4. रेवंत रेड्डी

5. व्ही. डी. सतीशन

6. कौशल विद्यार्थी

7. आशुतोष (PSO)

8. ई. टी. मोहम्मद बशीर

9. एम. खरगे

10. सोनिया गांधी

11. ममता बॅनर्जी

12. सुधाकर सिंह

13. अभिषेक बॅनर्जी

14. प्रणव झा

15. मटिल्डा

16. अभय कुमार सिन्हा

17. कुमारा

18. मा. बेबी

19. कपिल सिब्बल

20. राजीव राय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.