महामार्गावर भीषण अपघात! काँग्रेस नेता अन् बजरंग दलाच्या अध्यक्षाचा जागीच मृत्यू

Madhya Pradesh Sagar District Horrific Road: मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात टीकमगड रोडवर ट्रक आणि बोलेरोची भीषण धडक झाली. या अपघातात काँग्रेस नेते उत्तम यादव आणि बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सिंह लोधी यांचा मृत्यू झाला असून चालक गंभीर जखमी आहे.
Madhya Pradesh Sagar district horrific road accident
Madhya Pradesh Sagar district horrific road accidentsaam tv
Published On: 

मध्य प्रदेशातील सागर जिल्हयात भीषण रस्ते अपघाताची घटना घडली आहे. शाहगढ पोलिस ठाण्याच्या हद्दीत टीकमगड रोडवर मध्यरात्री ट्रक आणि बोलेरोची समोरासमोर जोरदार धडक झाली. सिमरिया गावाच्या पुढे बीला नदीच्या पुलाजवळ हा अपघात झाला. या दुर्घटनेत बोलेरोमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, चालक गंभीर जखमी झाला आहे. मृतांमध्ये छतरपूर येथील राष्ट्रीय बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष आणि काँग्रेसच्या नेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

Madhya Pradesh Sagar district horrific road accident
MLA Disqualification Case Maharashtra | आमदार अपात्रतेचा निर्णय वेळेआधीच लागणार-सूत्र

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे 2 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक आणि बोलेरोची धडक इतकी भीषण होती बोलेरोच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

राष्ट्रीय बजरंग दलाच्या जिल्हाध्यक्षांचाही मृत्यू

या अपघातात छतरपूर जिल्ह्यातील भगवा परिसरातील हरिनगर येथील 26 वर्षीय प्रमोद सिंह लोधी यांचा मृत्यू झाला. बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष असल्याची माहिती आहे. तसेच बदलेन खेडा 35 वर्षीय उत्तम यादव यांचाही या अपघातात मृत्यू झाला. उत्तम यादव हे कॉँग्रेस पक्षाशी संबंधित होते. या दुर्घटनेत बोलेरोचा चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्याला सागर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Madhya Pradesh Sagar district horrific road accident
Vande Bharat Express : वंदे भारत ट्रेनच्या जेवणात चक्क लोखंडी बोल्ट! प्रवाशाच्या तक्रारीनंतर IRCTC ची मोठी कारवाई

अपघाताची माहिती मिळताच शाहगढ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याने छतरपूरसह परिसरात शोककळा पसरली आहे. दोघेही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. त्यांच्या निधनामुळे परिचित आणि स्थानिक नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ट्रक आणि बोलेरोची धडक नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. शाहगढ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.