अशोक खरातच्या प्रकरणात आर्थिक घोटाळ्याचा संशय
मुलाच्या जबाबातून हवाला रॅकेटचा खुलासा
शेल कंपन्या आणि पतसंस्थांद्वारे व्यवहाराचा आरोप
एसआयटीकडून सखोल तपास सुरू
वासनांध अशोक खरातचं आर्थिक रॅकेटही उघड झालंय. खरातच्या मुलानेच बापाच्या पापाचा भांडाफोड केलाय? खरात मात्र पतसंस्थेच्या माध्यमातून कशी उलाढाल करायचा. पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट...
महिलांचं लैंगिक शोषण करणारा वासनांध खरातच्या मुलानेच खरातचं हवाला कांड उघड केलंय.. होय... भोंदू खरातला अटक केल्यानंतर पोलीस खरातची पत्नी कल्पना खरातच्या अटकेसाठी घरी पोहोचले...मात्र तिथं खरातचा मुलगा हर्षवर्धन खरात आढळून आला.. त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवला.. त्यानंतर खरातचा मुलगा पोपटासारखा बोलायला लागला... आणि खरातच्या मुलानेच वडीलांच्या पापाचा भांडाफोड केला...
आमच्या घरात नोटांच्या थप्प्या यायच्या. त्या नोटांवर माझ्या वडिलांचं पूर्ण नियंत्रण असायचं. ते पैसे कुठून आले, हे त्यांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही. घरात येणारा प्रत्येक रुपया माझ्या वडिलांच्या आदेशानुसार यायचा आणि जायचा. खरातच्या मुलाच्या याच जबाबामुळे पोलिसांना हवाला रॅकेटचा संशय आला..भक्तांना गंडा घालून कमावलेला काळा पैसा पांढरा करण्यासाठी खरातने अनेक क्लृप्त्या रचल्या.
शेल कंपन्या, ईशान्येश्वर मंदिर आणि शिवनिका संस्थानच्या संचालकांच्या माध्यमातून खरात काळा पैसा पांढरा करत असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. त्याच दरम्यान अहिल्यानगरच्या समता आणि जगदंबा पतसंस्थेत खरातचे खाते आढळून आलेत. विशेष म्हणजे समता पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे हेसुद्धा खरातचे भक्त असल्याचं समोर आलंय.
काका कोयटेंच्या समता पतसंस्थेत खरातची 100 खाती आढळून आलीत. तर जगदंबा पतसंस्थेत 32 खाती आढळून आलेत. तर समता पतसंस्थेत रुपाली चाकणकरांचंही खातं असल्याचं समोर आलंय. त्यामुळे खरात हाच पैसा हजारो कोटींचं आर्थिक साम्राज्य उभं करण्यासाठी, वेगवेगळ्या शेल कंपन्या निर्माण करण्यासाठी वापरत होता का? याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. जर खरातच्या या हवाला रॅकेटची आणि आर्थिक कनेक्शनही चौकशी झाली तर बडे मासे गळाला लागण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होणार का? आणि खरातचं रॅकेट उद्ध्वस्त होणार का? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.