Ashok Kharat: भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड, आधी अत्याचार मग महिलांचा गर्भपात करायचा

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या तपासातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. खरात ओश्नो जलातून महिलांचा गर्भपात करायचा. आधी अत्याचार करायचा नंतर तो महिलांना गर्भपात करायला लावायचा.
Ashok Kharat: भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड, आधी अत्याचार मग महिलांचा गर्भपात करायचा
Ashok Kharat CaseSaam Tv
Published On

Summary -

  • अशोक खरात प्रकरणात नवीन धक्कादायक खुलासे

  • महिलांवर अत्याचारानंतर गर्भपात केल्याचा आरोप

  • एसआयटी चौकशीतून धक्कादायक माहिती उघड

  • अशोक खरात ओश्नो जलातून महिलांचे गर्भपात करायचा

रोहित कदम, साम टीव्ही

भोंदूबाबा अशोक खरातचा आणखी एक कारनामा एसआयटी चौकशीतून उघडकीस आलाय. खरात ओश्नो जलातून गर्भपात करायचा. नेमकी त्याची मोडस ऑपरेंडी काय होती ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवनवे कारनामे समोर येत आहेत. अशातच आता भोंदूबाबा अशोक खरातचा नवा विकृत कारनामा समोर आलाय...महिलांना भूरळ घालून लैगिंक अत्याचार केल्य़ानंतर गर्भवती महिलांचा खरात गर्भपात करत असल्याची धक्कादायक बाब एसआयटीच्या चौकशीतून समोर आलीय. खरातची बळी ठरलेल्या एका महिलेच्या चौकशीतून हा विकृत प्रकार समोर आलाय. यासाठी खरात ओश्नो जलाचा वापर करत असे..नेमकी त्याची काय मोडस ऑपरेंडी होती आणि चौकशीतून आणखी काय समोर आलं.

Ashok Kharat: भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड, आधी अत्याचार मग महिलांचा गर्भपात करायचा
Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

खरात ओश्नो जलातून गर्भपात करायचा. गर्भपाताच्या गोळ्या पुरवणाऱ्या डॉक्टरांची SIT चौकशी करणार आहे. पीडित गर्भवती असताना खरातनं गोळ्या देऊन गर्भपात करण्यास भाग पाडलं. खरातच्या कार्यालयातील औषधं आणि पेढ्यांच्या नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे. भोंदू खरातवर महिला अत्याचार आणि फसवणुकीचे एकूण 11 गुन्हे दाखल आहेत. घटस्फोटाचं खोटं भविष्य सांगून अत्याचार केल्याप्रकरणी पुन्हा ताब्यात घेतलं.

Ashok Kharat: भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड, आधी अत्याचार मग महिलांचा गर्भपात करायचा
Ashok Kharat: भोंदू खरातच्या जिवाला धोका? SIT नं घेतला मोठा निर्णय, कोर्टाकडूनही ग्रीन सिग्नल

एसआयटीच्या धक्कादायक खुलाश्यानंतर खरात प्रकरणाला नवं वळण लागलंय. गर्भपात करण्यासाठी खरातकडे गोळ्या कशा आल्या आणि कुणी दिल्या. तसंच, यामागे गर्भपातांच रॅकेट आहे का, यादृष्टीने तपास होणं अत्यंत गरजेचं आहे. इतकंच नाही तर गर्भपाताच्या गोळ्या पुरवणाऱ्या डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावरही कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

Ashok Kharat: भोंदू खरातचा आणखी एक कारनामा उघड, आधी अत्याचार मग महिलांचा गर्भपात करायचा
Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं कनेक्शन उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com