Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं कनेक्शन उघड

Ashok Kharat Scam: अशोक खरात प्रकरणात एक धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचे कनेक्शन उघड झाले आहे. अशोक खरात नाशिकच्या पंतसंस्थांमध्ये ज्या खात्यांचा नॉमिनी होता त्यामध्ये चाकणकरांच्या बहिणीचेही खाते आहे.
Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं कनेक्शन उघड
Rupali Chakankar saam tv
Published On

Summary -

  • अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा

  • रुपाली चाकरणकर यांच्या बहिणीचं कनेक्शन समोर

  • १०० कोटी रुपयांहून अधिक व्यवहार उघड

  • एसआयटीकडून कसून तपास सुरू

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला नेत्या रुपाली चाकणकर या अडचणीत आल्या आहेत. या प्रकरणात रुपाली चाकणकरांनंतर आता त्यांच्या बहिणीचेही कनेक्शन उघड झाले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये असलेल्या पतसंस्थांमध्ये रुपाली चाकणकर यांच्या बहिणीच्या नावाने खाते असल्याचे तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात अनेक राजकीय नेते, मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची नावं समोर आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, भोंदूबाबा अशोक खरातने अनेकांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन कारनामे केले आहेत. नाशिक जिल्ह्यातील २ पतसंस्थांमध्ये खरात शेकडो खात्यांचा नॉमिनी आहे. धक्कादायक बाब म्हणजे रुपाली चाकणकरांच्या बहिणीच्या नावानेही या पतसंस्थांमध्ये खाते असल्याचं उघड झालं. या खात्यांमार्फत अशोक खरातने १०० कोटीहून अधिक रुपयांचे व्यवहार केल्याचे समोर आले आहे. अशोक खरात स्वत:च ही सगळी खातं हाताळत होता.

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं कनेक्शन उघड
Ashok Kharat Case: नगरसेवक होऊ शकत नाही, बुवाबाजी करून आमदार, मंत्री व्हायचंय; भाजपच्या महिला नेत्याचा रोख कुणाकडे?

ज्या पतसंस्थांमध्ये खरातने अनेकांचे आधारकार्ड आणि पॅनकार्ड वापरून गैरव्यवहार केला होता. त्या सर्व खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक आहे. या प्रकरणी आता दोन्ही पतसंस्थेचे चेअरमन आणि मॅनेजर यांची एसआयटीकडून चौकशी सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरातने ज्योतिषी असल्याचे सांगत शेकडोपेक्षा जास्त महिलांची फसवणूक केली. त्यांचे त्याने शारीरिक शोषण केले. या प्रकरणात खरातचे अनेक महिलांसोबतचे धक्कादायक व्हिडीओ देखील समोर आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. एसआयटी आणि नाशिक पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

Ashok Kharat Case: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी अपडेट, रुपाली चाकणकरांच्या बहिणीचं कनेक्शन उघड
Ashok Kharat: भोंदू खरातच्या जिवाला धोका? SIT नं घेतला मोठा निर्णय, कोर्टाकडूनही ग्रीन सिग्नल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com