खरातने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार, गर्भपात करण्यासाठी गोळ्या दिल्या? कोर्टात नेमकं काय काय झालं?

Ashok Kharat case : महिलांवरील लैंगिक अत्याचार, धमक्या आणि जमीन हडप प्रकरणात अशोक खरात याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपासात गुंगीच्या औषधांचा वापर आणि इतर गंभीर बाबींचा शोध घेतला जात आहे.
Ashok Kharat Case:
A viral photo in the Ashok Kharat case reveals a new face, intensifying allegations of political and financial links.saam tv
Published On

Ashok Kharat sexual exploitation case police custody details : महिलांवर लैंगिक अत्याचार, जमीन हडपणे, धमकावणे या प्रकरणात भोंदू अशोक खरात याला ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता तो ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहे. अशोक खरात याला आज कोर्टात ऑनलाइन हजर करण्यात आले, सुरक्षेच्या कारणास्तव एसआटीकडून कोर्टाकडे ऑनलाइन सुनावणी घेण्याची विनंती केली होती. कोर्टात सरकारी वकील आणि आरोपीच्या वकिलामध्ये जोरदार युक्तीवाद झाला. तुम्हाला काही बोलायचं आहे का? असं कोर्टानं विचारल्यानंतर अशोक खरात याने होत जोडून मला काहीही बोलायचं नाही, असे सांगितले.

अशोक खरातच मास्टरमाईंड, अजून तपास करायचाय?

अशोक खरात याने महिलांवर अत्याचार केले. त्यांच्या आई वडिलांना धमकावले. त्यांचे आधार कार्ड का घेतले? याचा तपास करायचा आहे. अशोक खरात औषधं काय वापरायचा हे तपासाचे आहे. आरोपी हा मास्टरमाईंट आहे, तो तपासात सहकार्य करत नाही. सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात यावी. लैंगिक शोषणाचा गुन्हा असल्याने विचार करून तपास कमी, चौकशी करायची आहे, असे सरकारी वकील शैलेंद्र बागडे म्हणाले.

अशोक खरात याने पीडितेवर वेळोवेळी बलात्कार केला. गर्भपात करण्यासाठी औषधे दिली, ती औषधे कुठून आणली? तसेच पीडितेला साडेबारा हजार रु देऊन एकास औषध देण्यास सांगितले होते. तिच्या आईवडिलांकडून आधारकार्ड घेतले होते, त्याचा उपयोग कुठे केला? आरोपी महिलांना पिण्यास पाणी देत असे, त्यात तो काय टाकत होता? याचा तपास करणे आवश्यक आहे, त्यामुळे पोलीस कोठडी द्यावी, असे शैलेंद्र बागडे म्हणाले.

Ashok Kharat Case:
Solapur : सोलापूर हादरले! पत्नीने सासरी येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने ३ मुलांना शेतात नेऊन पाजले विष

पीडितेला गुंगीचे औषध देण्यात आले -

अशोक खरात याने पीडितेला आमिष दाखवून अत्याचार केला आहे. त्याने लग्नाचे आमिष दाखवल्याचा पीडितेचा आरोप आहे. तिला गोळ्या देण्यात आल्या, त्या गोळ्या कुठून आणल्या? पीडितेला गुंगीचे औषध देण्यात आले. ते औषध नेमके काय होतं याचा सखोल तपास करायचा आहे. पीडितेच्या आई वडिलांचे आधार कार्ड घेतले होते, त्याचा वापर कुठे केला? याचा तपास करायचा आहे.

सदर गुन्ह्याच्या संदर्भात सखोल चौकशी करायची आहे, यात अजून कोण सहभागी आहे का? आम्हाला चौकशी करायची आहे, म्हणून पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी तपास अधिकारी किरण कुमार सूर्यवंशी यांनी केली.

Ashok Kharat Case:
NCP: आधी पार्थ खासदार, आता जय पवारांकडे मोठी जबाबदारी; सुनेत्रा पवारांनी सूत्रे फिरवली

अशोक खरातचे वकील काय म्हणाले ?

वकील पत्रावर सही करता आली नाही, व्हीसीद्वारे आरोपीला हजर करणार होते, याबाबत मला माहिती नव्हते. पहिले त्यांना पोलिस कोठडी देण्यात आलेली आहे. या चौदा दिवसांच्या पोलिस कोठडीत त्यांनी खुलासे केलेले आहेत. माझ्याकडे अजून एकही गुन्ह्याची फिर्याद आलेली नाही. मला एफआयआर वाचायला मिळालेली नाही. गर्भपात झाले असे म्हणतात मात्र त्याचा कालावधी काय होता? काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, असे अशोक खरात याचे वकील सचिन भाटे यांनी युक्तीवाद केला.

Ashok Kharat Case:
सुनेत्रा पवारांचे आयोगाला पत्र, प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे आउट, राष्ट्रवादीमधील नाट्याचा घटनाक्रम समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com