NCP: आधी पार्थ खासदार, आता जय पवारांकडे मोठी जबाबदारी; सुनेत्रा पवारांनी सूत्रे फिरवली

Jay Pawar role NCP: सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे बदल करत जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षातील नेतृत्व बदल आणि नव्या जबाबदाऱ्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Jay Pawar Parth Pawar
Jay Pawar Parth PawarSaam TV Marathi
Published On

Jay Pawar appointed in NCP national executive details : जय अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात तयार झालेली पोकळी भरण्यासाठी हा निर्णय घेतला गेल्याचे सांगितले जात आहे. पार्थ पवार नुकतेच राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेलेत, त्यानंतर छोटा भाऊ जय पवारही राजकारणात सक्रीय झाला आहे. पार्थ पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सामील करण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांनी आयोगाला पाठवलेल्या पत्रात जय पवार यांच्या नावाचा उल्लेख दिसत आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

जय पवार राष्ट्रीय कार्यकारिणीत -

२६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. त्यानंतर १० मार्च रोजी त्यांनी आयोगाला पत्र पाठवले. पक्षाच्या बैठकीतील निर्णय आणि पदाधिकारी यादी सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाकडे पाठवली. सुनेत्रा पवारांकडून फक्त १४ पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये जय पवार यांचेही नाव आहे. पहिल्यांदाच पक्षाच्या कुठल्याही पदावर जय पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Jay Pawar Parth Pawar
Samruddhi Highway Accident : समृध्दीवर भयंकर अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू, ट्रकच्या धडकेत पिकअपचा चुराडा

१४ जणांचा उल्लेख, कुणाची नावे?

राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्याच नावाचा उल्लेख आहे. खजिनदार म्हणून शिवाजीराव गरजे यांचा उल्लेख आहे. तर संघटनात्मक निवडणूक रचना म्हणून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, माणिकराव कोकाटे, दिलीप वळसे पाटील, चेतन तुपे, शेखर निकम, सुबोध मोहिते, सरोज अहिरे, सना मलिक, जय पवार आणि धीरज शर्मा यांचा उल्लेख केला आहे. सुनील तटकरे यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून उल्लेख नाही आणि प्रफुल्ल पटेल यांचाही राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ गट पडले आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Jay Pawar Parth Pawar
सुनेत्रा पवारांचे आयोगाला पत्र, प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे आउट, राष्ट्रवादीमधील नाट्याचा घटनाक्रम समोर

पार्थ केंद्रात, जय पक्ष संघटनेत कार्यरत -

अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाची जबाबदारी घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, त्याशिवाय राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. पार्थ पवार यांची राज्यसभा खासदारपदी नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आता जय पवार यांच्यावर पक्षात मोठी जबाबदारी देण्यात आली. पार्थ पवार खासदार होऊन राज्यसभेत पक्षाची बाजू मांडतील तर जय पवार पक्ष संघटनेत काम करतील.

Jay Pawar Parth Pawar
Solapur : सोलापूर हादरले! पत्नीने सासरी येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने ३ मुलांना शेतात नेऊन पाजले विष

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com