सुनेत्रा पवारांचे आयोगाला पत्र, प्रफुल्ल पटेल-सुनील तटकरे आउट, राष्ट्रवादीमधील नाट्याचा घटनाक्रम समोर

NCP internal conflict : सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित होत असून पक्षात अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे.
Sunetra Pawar
Sunetra PawarSaam TV Marathi
Published On

Sunetra Pawar letter to Election Commission controversy : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) अंतर्गत संघर्षाची ठिणगी पडल्याचे वृत्त समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या एका पत्रामुळे राजकीय खळबळ माजली आहे. या पत्रात पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पदांचा कोणताही उल्लेख नसल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी या पत्राद्वारे पटेल-तटकरे जोडीला 'साईडलाईन' करण्याचे संकेत दिले आहेत का? अशा चर्चांना आता उधाण आले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढील पदाचा संदर्भ आणि इतर तांत्रिक बाबींवरून वाद सुरू असतानाच सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर गेल्या आहेत. बुधवारी रात्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार आज अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे समजतेय. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेले अंतर्गत वाद आणि निवडणूक आयोगाशी सुरू असलेला पत्रव्यवहार या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

सुनेत्रा पवार यांनी भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) लिहिलेले एक पत्र सोशल मीडियावर समोर आले आहे. या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नाही. त्यातच बुधवारी रात्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये दाखल झाल्या आहेत. आज त्या एनडीएच्या प्रमुख नेत्यांची भेट घेणार असल्याचे समजतेय. २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर अजित पवार यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. प्रफुल्ल पटेल पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष आणि तटकरे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाले. २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात अजित पवार यांचं अकाली निधन झालं. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी सुनेत्रा यांची पक्षाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाली होती.

Sunetra Pawar
Solapur : सोलापूर हादरले! पत्नीने सासरी येण्यास दिला नकार, संतापलेल्या पतीने ३ मुलांना शेतात नेऊन पाजले विष

सुनेत्रा पवार यांनी १० मार्च रोजी आपल्या नियुक्तीबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्यांनी स्वतः पक्षाध्यक्ष आणि शिवाजीराव गर्जे खजिनदार यांच्यासह १४ पदाधिकाऱ्यांची यादी असलेले पत्र पाठवले होते. या पत्रात प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि जय पवार यांच्यासह उर्वरित १२ सदस्यांच्या कोणत्याही पदांचा उल्लेख नाही. याबाबतचे वृत्त NBT ले दिले आहे.

Sunetra Pawar
पुणे हादरलं! बाप हैवान झाला, पोटच्या १५ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार

सुनेत्रा पवार यांच्या पत्रात नेमकं काय ?

२८ जानेवारी ते २६ फेब्रुवारी, म्हणजेच अजित पवार यांच्या निधनानंतर आणि पक्षाध्यक्षपदी त्यांच्या नियुक्तीपर्यंतच्या काळात पाठवलेले कोणतेही संदेश किंवा माहिती विचारात घेऊ नये. असे पत्र सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवले होते. हे पत्र समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तटकरे-पटेल आणि पवार असे दोन गट झाले आहेत का? अशी राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

Sunetra Pawar
Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com