पुणे हादरलं! बाप हैवान झाला, पोटच्या १५ वर्षाच्या मुलीवर केला बलात्कार

Pune crime news : पुण्यातील चाकण परिसरात १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
Shocking : जन्मदात्या बापाचं हैवानी कृत्य; पोटच्या मुलीवर बलात्कार
Crime NewsSaam Tv
Published On

रोहिदास गाडगे, पुणे प्रतिनिधी

Pune Chakan minor assault case father arrested POCSO details : १५ वर्षाच्या मुलीला घरात एकटं पाहून बापाची नियत फिरली. पोटच्या मुलीला धमकावले अन् नराधम बापाने बलात्कार केला. पुण्यातील चाकण दावडमळा परिसरात नात्याला काळिमा फासणारी ही धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. बापाच्या अत्याचारानंतर मुलीने हिम्मत दाखवत पोलीस स्टेशन गाठलं अन् तक्रार दिली. १५ वर्षाच्या मुलीचे शब्द ना शब्द ऐकल्यानंतर पोलिसही हादरून गेले. त्यांनी तात्काळ नराधम बापाला बेड्या ठोकल्या.

चाकण दावडमळा परिसरातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या वडिलांनी जबरदस्तीने अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीने चाकण पोलीसांत दिलेल्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी चाकण उत्तर पोलीस ठाण्याने आरोपी वडिलाला तात्काळ अटक केली आहे. पीडित मुलगी घरी एकटी असताना आरोपीने तिला धमकावून जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणात सर्वात धाडसी बाब म्हणजे, १५ वर्षीय पीडित मुलीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपीला बेड्या ठोकल्या.

Shocking : जन्मदात्या बापाचं हैवानी कृत्य; पोटच्या मुलीवर बलात्कार
Baramati bypoll : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात ३ जण लढणार, कुणी कुणी भरला उमेदवारी अर्ज?

सध्या आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत (बालकांविरुद्ध लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) आणि संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.ही घटना उघडकीस आल्यानंतर चाकण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अनेकांनी आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सामाजिक संघटनाही या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी पोलिस प्रशासनाकडे आग्रह धरत आहेत.या प्रकरणात उत्तर चाकण पोलिसांतडुन पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आली असून, वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे.

Shocking : जन्मदात्या बापाचं हैवानी कृत्य; पोटच्या मुलीवर बलात्कार
LPG Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा वाढ, ४ महिन्यात ₹५०० ने महागला

आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून, त्याला कोठडी मिळण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे चाकणसह आसपासच्या भागात अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली जात आहे.अशा घटनांमुळे समाजात राग आणि नैराश्य पसरले असून, पालकांनी मुलींच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष द्यावे आणि कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.

Shocking : जन्मदात्या बापाचं हैवानी कृत्य; पोटच्या मुलीवर बलात्कार
Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com