पॅन आणि आधारवरील नाव चुकले तर होईल बंद
१ एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार
१ एप्रिलपूर्वी नावामधील दुरूस्ती घ्या करून
नावात फरक असल्यास पॅन बंद होण्याची शक्यता
घरबसल्या५ मिनिटांमध्ये ऑनलाइन करा काम
१ एप्रिलपासून म्हणजे नव्या आर्थिक वर्षापासून अनेक नियमांमध्ये मोठे बदल होणार आहे. त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे. यापैकी एक नियम म्हणजे जर तुमच्या पॅन आणि आधारकार्डवरील नावाच्या स्पेलिंगमध्ये फरक असेल तर ते १ एप्रिलपासून बंद होऊ शकते. याचाच अर्थ जर तुम्ही पॅन आणि आधारवरील चुकीच्या नावामध्ये बदल केला नाही तर तुम्ही त्याचा वापर बँकिंग, आयटीआर भरणे किंवा इतर कोणत्याही आर्थिक कामांसाठी करू शकणार नाही.
फक्त पॅन आणि आधार लिंक असणे ऐवढेच पुरेसे आहे असे अनेकांना वाटत होते. पण आता पॅन आणि आधारकार्डवरील नाव देखील सारखेच असणे गरजेचे आहे. म्हणजे तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल नसावा. एका लहानशा स्पेलिंगच्या चुकीमुळेही मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे भविष्यातील समस्या टाळण्यासाठी १ एप्रिलपूर्वी तुम्ही घरबसल्या अवघ्या ५ मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. त्यासाठी काय करावे लागेल ते आपण जाणून घेणार आहोत...
आर्थिक प्रणालीमध्ये पारदर्शकता कायम राखण्यासाठी सरकारने तुमचा पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. अशात फक्त तुमचा पॅन लिंक करणे आता पुरेसे नाही. जर आधार आणि पॅन कार्डवरील नावे वेगळी असतील तर प्रणाली त्यांना वैध म्हणून ओळखणार नाही. जर तुम्ही वेळेच नावांमधील चुका दुरूस्ती केली नाही तर तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय असल्याचे घोषित केला जाऊ शकतो. म्हणजेच ते बंद केले जाईल. १ एप्रिलपासून हा नवा बदल करण्यात आला आहे. त्यापूर्वीच तुम्ही हे काम करून घ्या.
जर तुमच्या पॅन आणि आधारमधील नाव वेगळे असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला फक्त ५ मिनिटं लागणार आहे आणि हे काम तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धीतने करू शकता. जर आधारकार्डवरील नाव चुकीचे असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी सर्वप्रथम UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जा आणि 'अपडेट आधार' वर क्लिक करा. आता तुमचा आधार क्रमांक टाका आणि OTP ने लॉगिन करा. यानंतर, 'नाव अपडेट' पर्याय निवडा आणि योग्य नाव टाका. आता तुम्हाला एक वैध दस्तऐवज म्हणजेच पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र अपलोड करावे लागेल. ते सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल. ज्याद्वारे तुम्ही नावात बदल झालाय की नाही ते चेक करून शकता.
तुमच्या पॅनकार्डवरील नाव चुकीचे असल्यास ते बदलण्यासाठी तुम्हाला NSDL किंवा UTIITSL वेबसाइटवर जावे लागेल. 'पॅन दुरुस्ती' फॉर्म उघडा. तुमचा पॅन क्रमांक आणि अचूक नाव तिथे टाका. आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, ओळखपत्र अपलोड करा आणि शुल्क भरा. फॉर्म सबमिट करा. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही दिवसांमध्ये तुम्ही नावामध्ये केलेली दुरुस्ती दिसून येईल आणि तुम्हाला नवीन पॅनकार्ड मिळेल. महत्वाचे म्हणजे, आधार आणि पॅनकार्डवरील तुमचे नाव बरोबर असल्याचे खात्री झाल्यानंतर तुम्ही आयकर विभागाच्या वेबसाइटवर जाऊन 'लिंक आधार स्टेटस' तपासा. ते लिंक झालेले नसल्यास तुमचा पॅन आणि आधार पुन्हा लिंक करावा लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.