

पॅन कार्डचे नवीन नियम जारी होणार
१ एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार
पॅन कार्ड काढण्यासाठी ही कागदपत्रे गरजेची
प्रत्येक भारतीयांसाठी काही कागदपत्रे खूप गरजेची असतात. यामध्ये आधार कार्ड आणि पॅन कार्डचा समावेश आहे. या दोन्ही कागदपत्रांशिवाय तुमची अनेक कामे रखडली जातात. बँक अकाउंट सुरु करण्यापासून ते लोनपर्यंत सर्व कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे. दरम्यान, आता पॅन कार्ड काढण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.
पॅन कार्ड काढण्याचे नियम १ एप्रिलपासून बदलणार आहे. पॅन कार्डसाठी अर्ज करताना फक्त आधार कार्ड नव्हे तर अर्जदाराची ओळख आणि जन्मासंबंधित कागदपत्रे जोडावी लागणार आहे.
आतापर्यंत फक्त आधार कार्ड पुरावा दाखवून पॅन कार्ड काढता येत होते. आता फक्त पॅन कार्ड नव्हे तर त्याचसोबत जन्म प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहनाचा चालवण्याचा परवाना, दहावीचे प्रमाणपत्र यासह इतर कागदपत्रे जोडणे बंधनकारक करण्यात येणार आहे. त्यामुळे पॅन कार्ड काढताना तुमच्याकडे ही कागदपत्रे असायलाच हवीत.
नवीन नियमांनुसार, पॅनकार्डमधील सर्व माहिती आधार कार्डशी जुळमे गरजेचे आहे. त्यामुळे दोन्ही कागदपत्रांमध्ये नाव, जन्मतारीख याबाबत अचूक माहिती असायला हवी. त्यामुळे पॅन कार्ड काढायला जाताना तुमच्याकडे ही कागदपत्रे आहेत की नाही याची खात्री करा.
१ एप्रिलपासून हे नियमदेखील बदलणार
पॅन कार्डसोबतच अनेक नियम १ एप्रिलपासून बदलणार आहेत. यामध्ये आयकर नवीन कायदा अमलात येणार आहे. यामुळे आयटीआर फाइल करणे खूप सोपे होणार आहे. आयकर कायदा खूप सोप्या भाषेत आहे. त्यामुळे करदात्यांना कायदा समजून घेण्यास फायदा होणार आहे. हा कायदा १ एप्रिलपासून लागू होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.