EPFO New Rule: EPFO कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! ७ लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे; कारण काय?

EPFO PF Refund Rule: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या खात्यात आता कोणत्याही क्लेमशिवाय पैसे जमा केले जाणार आहेत.
 EPFO Rule
EPFO RuleSaam Tv
Published On
Summary

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

७ लाख खातेधारकांच्या खात्यात येणार पैसे

कोणत्याही क्लेमशिवाय मिळणार पीएफ

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता ७ लाखांपेक्षा जास्त ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येऊ शकतात. ईपीएफओने नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत. याबाबत त्यांनी माहिती दिली आहे. ७ लाख कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील.

 EPFO Rule
EPFO खातेधारकांना झटका! PFवरील व्याजदर कमी करण्याची शक्यता; पुढच्या महिन्यात होणार निर्णय

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. ७ लाख कर्मचाऱ्यांची खाती निष्क्रिय करण्यात आली होती. ही अकाउंट पुन्हा एकदा सक्रिय केले आहेत. यामध्ये ३०.५२ कोटी रुपये परत केले जाणार आहे. ज्यांचे खाते बंद पडले आहेत त्यात रक्कम शिल्लक होती.

काय आहे प्रकरण?

ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, मागच्या ३ वर्षात ज्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. ज्या खात्यात १००० पेक्षा कमी रुपये आहेत त्यांचे खाते निष्क्रिय केले आहेत. ७ लाख खात्यात ३०.५२ कोटी रुपये आहेत. आता हे पैसे संबंधित खातेधारकांना पाठवले जाणार आहेत.

जर तुम्ही नोकरी सोडली असेल आणि पीएफ क्लेम केले नाही, अशा खातेधारकांना पीएफचे पैसे मिळणार आहे. ज्यांचे खाते बंद केले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे.

 EPFO Rule
EPFO 3.0 : खुशखबर! आता PF चे पैसे UPIने काढा; पण कसे? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

कोणत्याही क्लेमशिवाय मिळणार पैसे

ईपीएफओने दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही कागदपत्राशिवाय किंवा क्लेम करता तुम्हाला पैसे येणार आहेत. बँक खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. ऑटोमॅटिक पद्धतीने पैसे जमा केले जाणार आहे.

ज्या खातेधारकांचे बँक अकाउंट आणि आधार कार्ड लिंक आहेत. त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहे. ज्या पीएफधारकांचे निधन झाले आहे त्यांच्या नॉमिनीला पैसे दिले जाणार आहेत. जर एखाद्या खात्यात ३६ महिन्यांपर्यंत कोणतेही पैसे ट्रान्सफर झाले नाही, नोकरी बदलली आणि पीएफ क्लेम केला नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत.

 EPFO Rule
EPFO चा ऐतिहासिक निर्णय; आता UPI द्वारे पीएफ काढता येणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com