EPFO 3.0 : खुशखबर! आता PF चे पैसे UPIने काढा; पण कसे? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

EPFO PF Withdrawal Through UPI Process: ईपीएफओने कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार आहे. याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा.
EPFO 3.0
EPFO 3.0
Published On
Summary

पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार?

कधीपासून सुरु होणार सुविधा?

यूपीआयद्वारे पीएफचे पैसे काढण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस

संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे पीएफ अकाउंट असते. पीएफ अकाउंटमधील रक्कम तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत काढू शकतात. दरम्यान, पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये मोठी अपडेट आली आहे. आता तुम्ही यूपीआयद्वारे पीएफ ट्रान्सफर करु शकणार आहात. यामुळे प्रोसेस खूप सोपी आणि जलद होणार आहे. याआधी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी अर्ज करावा लागत होता. आता तुम्ही यूपीआयद्वारे पैसे ट्रान्सफर करु शकतात आणि पैसे काढूदेखील शकतात.

EPFO 3.0
EPFO Pension Hike: EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किमान पेन्शन ५ पटीने वाढणार; १००० वरुन थेट ५००० होणार

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने ईपीएफमधील पैसे यूपीआयद्वारे काढण्याची सुविधा देणार आहे. यामुळे ईपीएफओच्या एकूण ८ कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. तुम्हाला कोणत्याही कागदपत्राशिवाय ऑनलाइन पद्धतीने यूपीआयद्वारे पैसे काढता येणार आहे.

यूपीआयद्वारे पीएफचे पैसे कसे काढायचे? (How to Withdraw PF Through UPI See Process)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वात आधी पीएफ अकाउंट हे तुमच्या यूपीआय अकाउंटशी लिंक करावे लागणार आहे. बँक अकाउंटला आधीपासूनच आधार लिंक असायला हवे.यानंतर यूपीआयद्वारे पैसे थेट तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होतील. यानंतर तुम्ही एटीएमद्वारे पैसे काढू शकतात.

लवकरच करणार अॅप लाँच (EPFO 3.0 App)

ईपीएफओ लवकरच या सुविधेसाठी नवीन अॅप लाँच करणार आहे. यामध्ये तुम्ही पीएफचे पैसे सेव्हिंग अकाउंटमध्ये ट्रान्सफर करु शकतात. याचसोबत तुम्ही वेबसाइटवरुनदेखील पैसे ट्रान्सफर करु शकतात. यासाठी नवीन सुविधा सुरु केली जाणार आहे.

कधीपासून काढता येणार यूपीआयद्वारे पीएफ? (When will Withdraw PF Amount Through UPI)

ईपीएफओ सदस्य पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढू शकतात. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच एप्रिलपासून ही सुविधा सुरु होऊ शकते. यासाठी तुम्हाला पीएफ अकाउंट आणि यूपीआय लिंक करावी लागणार आहे.

EPFO 3.0
EPFO Latest Update: EPFO कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! आता 'या' महिन्यापासून PF तुमच्या UPI अकाउंटमध्ये जमा होणार, पण कसा? वाचा..

पीएफ खात्यातून किती पैसे काढता येणार? (How Much PF Money Withdraw Through UPI)

यूपीआयद्वारे तुम्ही किती पैसे काढू शकतात असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. नियमानुसार, तुम्ही ७५ टक्के रक्कम काढू शकतात. यासाठी कोणत्याही कागदपत्राची गरज नाही.मात्र, यूपीआयद्वारे पैसे काढायचे असतील तर महिना आणि प्रत्येक दिवसासाठी लिमिट निश्चित करण्याचा विचार सुरु आहे.

EPFO 3.0
EPFO Withdrawal Rule: रिटायरमेंटआधी कोणत्या कारणांसाठी काढू शकतात PFचे पैसे; वाचा EPFO चे नियम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com