EPFO Pension Hike: EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! किमान पेन्शन ५ पटीने वाढणार; १००० वरुन थेट ५००० होणार

EPFO Pension Hike 2026: ईपीएफओ नवीन वर्षात खासगी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज देण्याच्या तयारीत आहे. ईपीएफओच्या पेन्शनमध्ये वाढ केली जाऊ शकतो. पेन्शन ५ पटीने वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
EPFO
EPFO Saam Tv
Published On
Summary

EPFO कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

ईपीएफओच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची शक्यता

बेसिक पेन्शन १००० रुपयांवरुन ५००० होण्याची शक्यता

नवीन वर्षात ईपीएफओ कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आनंदाची बातमी मिळणार आहे. खासगी क्षेत्रातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवीन घोषणा करणार आहे. आता ईपीएफओ सदस्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे. पेन्शनमध्ये वाढ करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करत आहेत.

EPFO
EPFO: जुन्या कंपनीची गरज नाही! नोकरी बदलल्यावर आपोआप होणार PF ट्रान्सफर; EPFO चा महत्त्वाचा निर्णय

सध्या खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळणारी पेन्शन ही १००० रुपये आहे. ही पेन्शन खूपच कमी आहे. त्यामुळे ही पेन्शन वाढवून ५००० रुपये करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे.

महागाईमध्ये मोठा दिलासा

गेल्या अनेक वर्षांपासून ईपीएफओ पेन्शनधारकांना किमान पेन्शन वाढण्याची मागणी करत होते. वाढत्या महागाईच्या तुलनेत १००० रुपये अत्यंत कमी आहे. याच पार्श्वभूमीवर एम्प्लॉयीज पेन्शन स्कीमअंतर्गत हा बदल प्रस्तावित आहे.

ईपीएफओमध्ये नोंदणीकृत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी सलग दहा वर्षे सलग सेवा केल्यानंतर या योजनेचा लाभ मिळू शकतो. सध्या किमान पेन्शनचा लाभ घेतलेले निवृत्त कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.

EPFO
EPFO News : PF खातेधारकांसाठी गुड न्यूज! लग्नासाठी १०० टक्के पैसे काढू शकता, काय आहे प्रोसेस? वाचा सविस्तर

अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

देशाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर केला जाऊ शकतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ईपीएफओ बेसिक पेन्शन वाढवण्याच्या प्रस्तावाबाबत सामाजिक सुधारणा बैठकीत चर्चा झाली आहे.येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात यावर शिक्कामोर्तब होऊ शकतो. याचसोबत ज्येष्ठ नागरिकांसाठी ईपीएफओ अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकतो. यामध्ये पीएफचे पैसे ऑनलाइन पद्धतीने काढणे, पेन्शन वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करण्याची शक्यता आहे.

EPFO
EPFO Update: EPFO कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार; सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com